WI vs IND 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पहिला वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात संजू सॅमसनला भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. पण सॅमसन मैदानात होता. सूर्यकुमार यादवने सॅमसनची जर्सी घातली होती. क्षेत्ररक्षण करताना आणि फलंदाजी करताना सूर्याने सॅमसनला मैदानाहबाहेर ठेवले नाही.
या सामन्यात सूर्याने फलंदाजी करताना आपला ट्रेडमार्क शॉट मारला. त्याचा हा सुपला शॉट इतका जबरदस्त होता, की चेंडू खूप लांब गेला. वेगवान फलंदाजीचे हे दृश्य त्याने आठव्या षटकात दाखवले. सूर्याला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्याने 19 धावा केल्या.
What a mad shot from Surya 🔥pic.twitter.com/zRdPtqP4zW
— Johns. (@CricCrazyJohns) July 27, 2023
हेही वाचा – WI Vs IND 1st ODI : वेस्ट इंडिजचा विक्रम, 114 धावांत ऑलआऊट, कुलदीपचा चौकार!
भारतीय गोलंदाजांनी रचलेल्या फिरकीत वेस्ट इंडिज फलंदाज अडकले आणि त्यांना 114 धावाच करता आल्या. विंडीजचा संघ अवघ्या 23 षटकातच ऑलआऊट झाला. विंडीजकडून कप्तान शाय होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला इतर कुणाचीही साथ लाभली नाही. भारताकडून कुलदीप यादवने फक्त 6 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर जडेजाने 3 विकेट्स काढल्या. पदार्पणवीर मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – शाय होप (विकेटकीपर/कप्तान), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, एलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!