रोहित, द्रविड आणि टीम मॅनेजमेंट संजू सॅमसनचं करियर संपवतायत?

WhatsApp Group

WI vs IND 1st ODI Sanju Samson : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. यावरून असे दिसते की टीम इंडियाचे मॅनेजमेंट त्याच्याकडे आगामी आशिया चषक आणि त्यानंतर आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी बॅकअप यष्टीरक्षक म्हणून पाहत नाही. सॅमसनला संघातून वगळल्यानंतर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली.

संजू सॅमसनला विंडीजमध्ये यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली नाही तर तो कदाचित आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम पंधरामध्ये समाविष्ट नसणार, कारण जेव्हा इशान किशन मधल्या फळीत खेळणारा बॅकअप यष्टीरक्षक आणि बॅकअप सलामीवीर देखील आहे, तेव्हा संजू सॅमसनची जागा एकदिवसीय संघात राहणार नाही आणि राहुल केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतल्यावर संजू सॅमसनचे स्थान निश्चित होणार नाही.

हेही वाचा – WI Vs IND 1st ODI : भारताने जिंकला टॉस, ‘या’ खेळाडूचे पदार्पण! वाचा Playing 11

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – शाय होप (विकेटकीपर/कप्तान), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, एलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment