World Cup 2023 : दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ वर्ल्डकपमधून बाहेर!

WhatsApp Group

ICC World Cup 2023 : दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज (West Indies) क्रिकेट संघ भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकमध्ये स्थान मिळवण्यास मुकला आहे. विंडीजशिवाय विश्वचषक खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. ICC क्रिकेट विश्वचषक पात्रता 2023 च्या सुपर सिक्स सामन्यात, स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला आणि त्यांना विश्वचषक 2023 मधून बाहेर काढले. विंडीजचा संघ 48 वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघाने 43.3 षटकांत 3 गडी गमावून 185 धावा केल्या. स्कॉटलंडसाठी यष्टीरक्षक-ओपनर मॅथ्यू क्रॉसने नाबाद 74 धावांची सर्वोच्च खेळी खेळली तर ब्रँडन मॅककुलन 69 धावांवर बाद झाला. जॉर्ज मुंसीने 18 धावांची खेळी केली, तर कर्णधार रिची बेरिंग्टनने नाबाद 13 धावांचे योगदान दिले. स्कॉटलंड संघाने प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजला पराभूत केले आहे.

झिम्बाब्वेनेही विंडीजला हरवले

याआधी चालू स्पर्धेत वेस्ट इंडिजचाही झिम्बाब्वेकडून पराभव झाला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर विंडीजचे मनोधैर्य खचले होते. वर्ल्डकपच्या मुख्य ड्रॉमधून बाहेर राहण्याची टांगती तलवार त्याच्यावर टांगली गेली होती. विंडीजने 1975 आणि 1979 मध्ये सलग दोन वेळा विश्वविजेते होण्याचा मान मिळवला होता. याआधी विंडीजचा संघ टी-20 विश्वचषकासाठीही पात्र ठरू शकला नव्हता.

हेही वाचा – VIDEO : पुण्यात पोलिसाचे लाजिरवाणे कृत्य, प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांवर ओतले पाणी!

एकेकाळी वेगवान गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला कॅरेबियन संघ खाली जात असल्याचे या पराभवातून दिसून येत आहे. याची अनेक कारणे आहेत. मात्र, कारण काहीही असो, क्रिकेटचेही एक प्रकारे नुकसान होत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment