Joshua Da Silva’s Mother Meet Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहेत. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक घटना घडली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज जोशुआ डा सिल्वाच्या आईने तिचा आवडता भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची भेट घेतली. पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान जोशुआ कोहलीशी बोलला होता आणि त्याने असेही सांगितले होते की त्याची आई विराटची फलंदाजी पाहण्यासाठी आली होती.
जोशुआ विराटला म्हणत होता, “विराट तुझं शतक कर, मला तुला शतक पाहायचं आहे. माझी आई तुला फलंदाजी पाहण्यासाठी आली आहे. माझ्या आईने मला फोन करून सांगितलं की ती विराट कोहलीची मॅच बघायला येत आहे, माझा विश्वासच बसत नव्हता.”
Joshua da Silva couldn’t resist fanboying over King Kohli during the match.🤩#ViratKohli #WIvIND #Cricket pic.twitter.com/vWhBDSTwm1
— Sportskeeda (@Sportskeeda) July 21, 2023
हेही वाचा – VIDEO : भारत-बांगलादेश खेळाडूंमध्ये भांडण! सेलिब्रेशन करताना नडला आणि…
The moment Joshua Da Silva's mother met Virat Kohli. She hugged and kissed Virat and got emotional. (Vimal Kumar YT).
– A beautiful moment! pic.twitter.com/Rn011L1ZXc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 22, 2023
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर जोशुआची आई विराट कोहलीला भेटायला गेली आणि टीम बसमधून उतरताच विराट कोहलीला तिने मिठी मारली. यादरम्यान ती त्याला सांगताना दिसली की ती त्याची मोठी फॅन आहे. यादरम्यान ती विराटला पाहून भावूकही झाली. तिचा मुलगा जोशुआ डा सिल्वाने तिचे विराटसोबत फोटोही काढले.
Joshua Da Silva's mother said, "both me and Joshua are huge fans of Virat Kohli. He's one of the best ever, we're blessed to have him in this land. It was a blessing for Joshua to play this Test with Virat". pic.twitter.com/eLGAPnJXyp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 22, 2023
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराट कोहलीची जादू सर्व वयोगटातील लोकांवर आहे, हे जगाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या डावात भारताच्या 438 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगली सुरुवात केली आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 1 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत, यजमान अजूनही भारतापेक्षा 352 धावांनी मागे आहेत. वेस्ट इंडिजकडून कर्णधार क्रेग ब्रॅथवेट नाबाद 37 आणि कर्क मॅकेन्झी नाबाद 14 धावांवर खेळत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!