Video : फिफा वर्ल्डकपमध्ये हवाई गोल..! ब्राझीलच्या खेळाडूची सर्वत्र चर्चा; तुम्ही पाहिला?

WhatsApp Group

FIFA World Cup 2022 : पाचवेळा चॅम्पियन ब्राझीलने फिफा विश्वचषकात विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. ब्राझीलने पहिल्या सामन्यात सर्बियाचा २-० असा पराभव केला. दोन गोल करणाऱ्या ब्राझीलच्या या विजयात रिचर्लिसनने महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यादरम्यान रिचर्लिसनने असा गोल केला, ज्याची खूप चर्चा होत आहे. सोशल मीडियावर रिचर्लिसनच्या या गोलचे विश्वचषकातील सर्वोत्तम गोल म्हणून वर्णन केले जात आहे.

या विजयामुळे ब्राझीलचे ३ गुण झाले आहेत. जी गटात ब्राझीलने तीन गुण घेत अव्वल स्थान पटकावले आहे. टोटेनहॅम हॉटस्परचा फॉरवर्ड रिचार्लिसनने सामन्याच्या ६२व्या आणि ७३व्या मिनिटाला दोन गोल केले. दोन्ही संघांमधील पहिला हाफ बरोबरीत सोडला होता. पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात ब्राझीलने दमदार खेळ दाखवत दोन गोल केले.

हेही वाचा – डील असावी तर अशी..! मिळवा ६० हजारचा आयफोन फक्त २६,४९९ रुपयात; नक्की वाचा!

७३व्या मिनिटाला रिचार्लिसनचा गोल ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या स्टार खेळाडूने सर्बियन गोलरक्षक वांजा ​​मिलिन्कोविक-साविकला चकमा देत हवेत चेंडू उसळला आणि शानदार गोल केला. विरोधी संघाच्या गोलरक्षकाला काही समजण्यापूर्वीच चेंडू गोलपोस्टच्या आत गेला होता. साविकनेही चेंडू रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्याला त्यात यश आले नाही.

Leave a comment