Mohammad Amir | पाकिस्तान सुपर लीग 2024 सध्या पाकिस्तानमध्ये आयोजित केली जात आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरही या लीगचा एक भाग आहे. आमिर पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत आहे. पीएसएल 2024 चा 28 वा सामना क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात रविवारी कराचीमध्ये खेळला गेला. मोहम्मद आमिरही या सामन्याचा एक भाग होता. आता या सामन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये मोहम्मद आमिर चाहत्यांना शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील सामन्याचा आहे. त्या व्हिडिओमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचे खेळाडू बहुधा ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतत आहेत. सीमारेषेजवळील चाहते आपापल्या खेळाडूंसाठी भरभरून दाद देत आहेत. मात्र मोहम्मद आमिर तिथून जाताच काही चाहत्यांनी फिक्सर-फिक्सरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – हा मार्च संपण्यापूर्वी ‘ही’ कामे नक्की करून घ्या..!
हे ऐकून आमिरचे रक्त खवळले. यानंतर आमिरने अपशब्दही वापरले. ‘घर से यह सब सीखकर आते हो’ असंही तो म्हणताना दिसत आहे. 2010 मध्ये मोहम्मद आमिर स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झाला होता, त्यानंतर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती.
मोहम्मद आमिरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
31 वर्षीय मोहम्मद आमिरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी एकूण 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 119, एकदिवसीय सामन्यात 81 आणि T20 मध्ये 59 विकेट आहेत. आमिरने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!