Rahul Dravid Lifts T20 World Cup Trophy : 19 नोव्हेंबरची जी वेदना टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांना गेल्या 7 महिन्यांपासून जाणवत होती, ती 29 जूनने घालवून टाकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. भारतीय संघाचा हेड कोच राहुल द्रविडही आपल्या भावना लपवू शकला नाही.
टी-20 वर्ल्डकप भारतीय संघाच्या हाती सोपवल्यानंतर विराट कोहलीने तो राहुल द्रविडच्या हाती सोपवला. द्रविडने संपूर्ण संघासोबत ट्रॉफी उचलून आपल्या भावना सर्वांसमोर आणल्या. नेहमी शांत असणाऱ्या द्रविडचे हे सेलिब्रेशन अनेकांना आनंद देऊन देले.
Virat Kohli handing over the trophy to Rahul Dravid. Another great moment! pic.twitter.com/XEx1pHQqTP
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) June 29, 2024
हेही वाचा – BREAKING NEWS….! भारताने जिंकला टी-20 वर्ल्डकप, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवलं!
विराट कोहलीचे दमदार अर्धशतक आणि अक्षर पटेल-शिवम दुबे यांच्या महत्त्वपूर्ण खेळीने टीम इंडियाला 176 धावांपर्यंत मजल मारता आली, तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या क्षणी पुनरागमन केले आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ 171 धावांवर रोखले. यासह, 17 वर्षांनंतर, टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आणि अशी कामगिरी करणारा तिसरा संघ ठरला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा