Tanzim Hasan Sakib Aggression To Virat Kohli : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश सुपर-8 सामना खेळला जात आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 39 धावांची झटपट सलामी दिली. स्पर्धेत खराब खेळणारा विराट कोहली आज चांगल्या लयीत दिसला. त्याने 24 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 36 धावांची खेळी केली.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तन्झीम हसन शाकिबने त्याला क्लीन बोल्ड केले. विराटची दांडी गुल केल्यानंतर शाकिबने त्याला भलतेच अग्रेशन दाखवले. शाकिबच्या रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटपूर्वी कर्णधार रोहित शर्माने 23 धावांची खेळी खेळली.
Virat Kohli will personally handle him on the field if he comes to bat today pic.twitter.com/Sb4pvXKVfS
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) June 22, 2024
हेही वाचा – Air India महाराष्ट्रात सुरू करणार स्वतःची फ्लाइंग स्कूल, वैमानिकांची मागणी वाढणार!
Hope👀#india#indiancricket #bangladesh #viratkohli #viratfans #t20worldcup pic.twitter.com/08rFFcxk34
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) June 22, 2024
बांगलादेशने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या जागी झाकीर अलीला संधी मिळाली आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या स्पर्धेत भारतीय संघाची नजर विजयाकडे असेल. भारताने आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यांमध्ये विजयाचा झेंडा फडकावला आहे.
Virat Kohli will personally handle him on the field if he comes to bat today pic.twitter.com/Sb4pvXKVfS
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) June 22, 2024
सुपर-8 फेरीच्या पहिल्या सामन्यात रोहित ब्रिगेडने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. शनिवारी बांगलादेशचा पराभव करून भारत उपांत्य फेरीच्या संधी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे बांगलादेशला सध्याच्या फेरीत ऑस्ट्रेलियाकडून 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशला आता ‘करा किंवा मरो’ अशी परिस्थिती आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा