Rivaba Jadeja : गुजरातमधील जामनगरमधून भाजपच्या महिला नेत्यांमध्ये वाद झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जामनगर उत्तर येथील भाजपच्या आमदार रिवाबा जडेजा एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान कशावरून तरी भडकताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत भाजप आमदार रिवाबा जडेजा यांचा महापौर बिना कोठारी आणि स्थानिक खासदार पूनम मॅडम यांच्याशी वाद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा जडेजा आणि इतर महिला नेत्या जामनगरमधील लखोटा तलावावर जामनगर महापालिकेने आयोजित केलेल्या ‘मारी माती-मारो देश’ कार्यक्रमाला पोहोचल्या होत्या. रिवाबा जडेजा आणि जामनगरच्या महापौर बिना कोठारी यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर रिवाबा भडकल्या. हे भांडण पाहून खासदार पूनम मॅडम मदतीला आल्या, तेव्हा रिवाबा जडेजा यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि हा सगळा गोंधळ त्यांच्यामुळेच झाला, असे सांगितले.
Look at the arrogance of newly elected MLA #RivabaJadeja. She also scolder her senior leaders including #Jamnagar MP pic.twitter.com/t8qohADQZW
— Bhanu Karthik (@Bhanu_1207) August 17, 2023
हेही वाचा – लोकांना नग्न दाखवणारा ‘जादूचा आरसा’, किंमत 9 लाख; काय आहे ही भानगड?
व्हिडिओ सोशल मीडियावर
भाजपच्या तीन महिला नेत्यांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कामगार आणि पोलिसांच्या उपस्थितीत तिन्ही महिला नेत्या एकमेकांना कशा भिडल्या हे बघायला मिळतं. रिवाबा यांनी खासदार पूनम मॅडम यांना सांगितले की, तुम्हीच हा प्रश्न पेटवला आणि आता तुम्ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी माझ्यासाठी smart, over smart असे शब्द वापरलेत आणि मला काही म्हणायचे नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक पोलीस रिवाबा आणि इतर महिला नेत्यांना शांत करत आहे.
BJP MP, Mayor and MLA Rivaba Jadeja fought in front of workers and security guards.
Congress supporters extend their support to Rivaba Ji in this fight. (Ravindra Jadega’s wife) pic.twitter.com/QUKQQPI7bm
— Shantanu (@shaandelhite) August 17, 2023
या संपूर्ण वादानंतर रिवाबा यांनी सांगितले की, महामंडळाने आपल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. नऊ वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. पूनम मॅडम 10.30 ला पोहोचल्या. स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी चप्पल परिधान केली होती. जेव्हा माझी वेळ येते तेव्हा मी माझ्या चपला काढल्या, कारण आपल्या सैनिकांचा असाच आदर केला पाहिजे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!