बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : ‘हे’ फक्त आणि फक्त ऋषभ पंतच करू शकतो! पाहा Video

WhatsApp Group

IND vs AUS 1st Test : टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजीने चाहत्यांना रोमांचित केले. 27 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने भलेही 78 चेंडूत 37 धावा केल्या असतील, पण त्याच्या खेळण्याच्या शैलीने त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनाही घाम फुटला. पंतने 47.44 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. फलंदाजीदरम्यान पंतच्या एका कृतीने ऑस्ट्रेलियन समालोचकही हैराण झाले होते.

ऋषभ पंतने आपल्या खेळीदरम्यान असा षटकार मारला की गोलंदाजी करणारा पॅट कमिन्सही प्रेक्षक बनला. पंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषभ पंतचा ‘एअर स्ट्राइक’ पाहून सगळेच अवाक् झाले. खरं तर, भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 42 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. कमिन्सच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंतने जमिनीवर पडून षटकार ठोकला.

हेही वाचा – बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : पहिलाच दिवस सिनेमॅटिक..! भारताची जीवघेणी गोलंदाजी; ऑस्ट्रेलिया दिवसअखेर 67-7

चेंडू सीमारेषा ओलांडताच प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ऋषभ पंतने मारलेला हा अप्रतिम षटकार पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते, ऑस्ट्रेलियन समालोचक आणि भारतीय समालोचक आश्चर्यचकित झाले. ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सुद्धा ऋषभ पंतचा षटकार पाहून आश्चर्यचकित झाला. पॅट कमिन्स प्रेक्षकासारखा चेंडू पाहत राहिला. पंतकडे फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा करण्याचे अप्रतिम तंत्र आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment