Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपल्या कामगिरीने तसेच सौहार्दाने मने जिंकली. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात गोल्डन थ्रोद्वारे विश्वविजेता होण्याचा मान मिळविला. भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजचा पहिला प्रयत्न फाऊल झाला होता पण त्याने दुसऱ्या प्रयत्नात जोरदार पुनरागमन केले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसरे स्थान पटकावले. नीरज आणि अर्शदची मैत्री सर्वश्रुत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत.
हा व्हिडिओ मॅचनंतरचा आहे, जेव्हा नीरज चोप्रा पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला फोटो सेशनदरम्यान बोलावतो. अर्शदने दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक पटकावले. त्याचबरोबर या स्पर्धेचे कांस्यपदक चेक प्रजासत्ताकच्या याकुब वलेशच्या नावावर होते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की नीरज आणि याकूब त्यांच्या देशाच्या ध्वजासह फोटो क्लिक करण्यासाठी तयार आहेत, तेव्हा नीरजची नजर दूर उभ्या असलेल्या अर्शद नदीमवर पडते आणि तो त्याला फोटो क्लिक करण्यासाठी कॉल करतो. अर्शदही धावत येऊन नीरजजवळ उभा राहतो. मात्र यादरम्यान तो आपल्या देशाचा ध्वज आणण्यास विसरतो.
हेही वाचा – Rozgar Mela : PM मोदींकडून 51,000 जणांना अपॉइंटमेंट लेटर! पाहा Video
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. पुरुषांच्या भालाफेकीत त्याने 88.17 मीटरची नोंद केली. भारताच्या किशोर जेना 84.77 मीटरसह पाचव्या स्थानावर होता. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या आठमध्ये तीन भारतीयांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!