बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : चालू सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा ऋषभ पंतला सवाल, “आयपीएल ऑक्शनचं काय?”; पाहा मजेशीर Video

WhatsApp Group

Nathan Lyon Asked Rishabh Pant About IPL 2025 Auction : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी संघासाठी अनमोल धावा जोडल्या. केएल राहुलची विकेट वादग्रस्त ठरली. त्यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतसोबत ऑस्ट्रेलियन्स फलंदाजांनी माईंडगेम्स खेळायला सुरुवात केली.

पंत फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथल लायनने त्याला यावेळी ऑक्शनमध्ये कोणत्या संघासाठी खेळणार असे विचारले. यावर पंतनेही माहीत नाही, असे उत्तर दिले. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. आयपीएल 2025 ऑक्शन 24 व 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने पंतला रिटेन केलेले नाही. त्यामुळे तो कुठे जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

हेही वाचा – 21 वर्षीय मजुराने क्रॅक केली NEET परीक्षा, 720 पैकी मिळवले 677 गुण!

भारताने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत. भारताने 2018-19 आणि 2020-21 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. दोन्ही वेळी भारताने कांगारू संघाचा 2-1 असा पराभव केला होता.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 16 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी 10 कसोटी मालिका भारताने जिंकल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने 5 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. एक कसोटी मालिका अनिर्णित राहिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका 4-0 ने जिंकावी लागेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 जून ते 15 जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment