VIDEO : दोन पोरांनी जाहीर केला न्यूझीलंडचा टी-20 वर्ल्डकप संघ! व्हिडिओ बनवणाऱ्याचे कौतुक

WhatsApp Group

T20 World Cup 2024 : सध्या आयपीएलचे वारे वाहत असताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या सोशल मीडिया हँडलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर करताना बोर्डाचे कोणतेही मान्यवर उपस्थित नव्हते, तर दोन चिमुकल्यांनी ही जबाबदारी पार पाडली. या व्हिडिओची जगभर चर्चा होत आहे.

माटिल्डा आणि अँगस अशी या दोन मुलांची नावे आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या संघाची धुरा केन विल्यमसनच्या हाती सोपवली आहे. विल्यमसन चौथ्यांदा स्पर्धेत कप्तान असेल. वेगवान गोलंदाजी मॅट हेन्री वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. टिम साऊदी हा अनुभवी गोलंदाज विल्यमसनच्या सोबत आहे. साऊदी सातव्यांदा टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल. तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स काढणारा गोलंदाज आहे.

ट्रेंट बोल्टही आपला पाचवा टी-20 वर्ल्डकप खेळेल. रचिन रवींद्रसारखा अष्टपैलू खेळाडू या संघाचा महत्त्वाचा भाग असेल. बेन सीअर्स संघाचा ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह असेल. अॅडम मिल्न आणि काईल जेमिसन दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कप्तान), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी.

ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : बेन सीअर्स

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment