Video : अविश्वसनीय..! उडत्या ग्लेन फिलिप्सचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमाल कॅच

WhatsApp Group

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात रंगत झाली आहे. पाकिस्तान जवळपास पराभवाच्या आसपास आहे, त्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंचा अभ्यास चांगला झालेला दिसत आहे. न्यूझीलंडचा बेस्ट फिल्डर ग्लेन फिलिप्सने पुन्हा चाहत्यांना अचंबित केले आहे. फिलिप्सने कमाल कॅच घेत लोकांमध्ये खळबळ उडवून दिली.

न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. तो क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा असे पराक्रम करतो जे जवळजवळ अशक्य वाटतात. न्यूझीलंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळत आहे. नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानला विजयासाठी ३२१ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. पाकिस्तानच्या बॅटिंगवेळी, फिलिप्सने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक का मानले जाते.

हेही वाचा – रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत त्या..

ग्लेन फिलिप्सने पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिझवानला एका हाताने उडता झेल घेत तंबूत पाठवले. पहिल्या पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर रिझवानने विल्यम ओरुकीविरुद्ध कट शॉट खेळला. शॉट खूपच वेगवान होता आणि फिलिप्स बॅकवर्ड पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू त्याच्या डावीकडे खूप दूर होता. फिलिप्सने उडता सूर मारत एका हाताने चेंडू पकडला. रिझवानला १४ चेंडूत ३ धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याला स्वतःलाही या झेलवर विश्वास बसत नव्हता.

क्षेत्ररक्षण करण्यापूर्वी ग्लेन फिलिप्सने फलंदाजीतही चमत्कार केले. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. फिलिप्सने फक्त ३९ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात न्यूझीलंडने शेवटच्या १० षटकांत ११३ धावा केल्या. पाकिस्तानी संघासमोर विजयासाठी ३२१ धावांचे कठीण लक्ष्य आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment