Rashid Khan On Brian Lara : दोन महिन्यांपूर्वी, जेव्हा वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याने अफगाणिस्तान टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. पण अफगाणिस्तानने आता इतिहास रचला आहे. एकंदरीत लाराने अफगाणिस्तानबाबत जे भाकीत केले होते. ते खरे सिद्ध झाले आहे.
अफगाणिस्तान संघ 2010 पासून टी-20 विश्वचषक खेळत आहे, आता 2024 मध्ये प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. जी सध्या त्याची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. म्हणजेच, दीर्घ क्रिकेट प्रवासानंतर अफगाणिस्तान संघाने T20 विश्वचषकात विशेष स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीत 27 जून रोजी अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
सुपर 8 च्या सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव करून अफगाणिस्तानने प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला आणि ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला स्पर्धेतून बाहेर काढले. उपांत्य फेरीत स्थान निश्चित केल्यानंतर राशिद म्हणाला, ”आमच्यासाठी उपांत्य फेरी गाठणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. जेव्हा आम्ही न्यूझीलंडला पराभूत केले तेव्हा हा आत्मविश्वास वाढू लागला.”
A touching speech by the Afghanistan captain. ❤️
— Johns. (@CricCrazyJohns) June 25, 2024
– RASHID KHAN IS THE 🐐 IN T20I. pic.twitter.com/Q9DDafG8sL
बांगलादेशविरुद्ध 4 बळी घेणारा कर्णधार राशिद म्हणाला, ”एकच व्यक्ती आहे ज्याने सांगितले की आम्ही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो आणि तो म्हणजे ब्रायन लारा. आम्ही त्यांना बरोबर सिद्ध केले. जेव्हा आम्ही त्यांना वेलकम पार्टीमध्ये भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितले की आम्ही तुला मान खाली घालायला लावणार नाही.”
हेही वाचा – दिग्गज क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरची निवृत्ती, टी-20 वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर होताच करिअरचा अंत!
अफगाणिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण असेल, असे राशिद म्हणाला. तो म्हणाला, ”ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आम्ही आधी अंडर-19 स्तरावर असे काही केले आहे, परंतु या स्तरावर नाही. देशात काय वातावरण असेल हे मी वर्णन करू शकत नाही. हा आनंद देशवासियांना देण्यासाठी आम्हाला कोणत्याही किंमतीत उपांत्य फेरी गाठायची होती.”
ब्रायन लारा म्हणाला होता…
लारा मे महिन्यात म्हणाला होता, ”वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. चौथ्या स्थानासाठी माझा डाव अफगाणिस्तानच्या डार्कहॉर्सवर आहे. मी गटबाजी पाहिली नाही, पण अफगाणिस्तानने यापूर्वी जेवढे विश्वचषक खेळले आहेत ते पाहता हा संघ प्रगतीच्या मार्गावर आहे आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकतो.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा