Video : आर्रर्र हे काय! एका बॉलमध्ये दिले 18 रन्स; भारतीय क्रिकेटर चर्चेत

WhatsApp Group

Most Expensive Ball in Cricket History : एका चेंडूत १८ धावा. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते आणि असा प्रकार घडला आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL  2023) 2023 दरम्यान घडली. या स्पर्धेत एका गोलंदाजाने एका चेंडूत 18 धावा केल्या. TNPL च्या दुसऱ्या सामन्यात सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात चेपॉक सुपर गिलीजच्या खेळीदरम्यान, 20 वे षटक असे होते की त्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. कॅप्टन अभिषेक तन्वर स्वत: सालेम स्पार्टन्सकडून शेवटची ओव्हर टाकायला आला. अभिषेकला माहीत नव्हते की त्याच्यासाठी 6 चेंडू टाकणे म्हणजे डोंगरावर चढण्यासारखे आहे.

अभिषेकने पहिला चेंडू टाकला तेव्हा उथिरासामी शशिदेव स्ट्राईकवर होता. पहिल्या चेंडूवर शशिदेवने एक धाव घेतली. त्यानंतर संजय यादव स्ट्राइकवर आला. दुसऱ्या चेंडूवर संजयने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव होऊ शकली नाही. चौथ्या चेंडूवर संजयने 1 धाव घेतली. पाचवा चेंडू नो बॉल होता. त्यानंतर अभिषेकच्या पुढच्या चेंडूवर शशिदेवने धाव काढली. आता शेवटचा चेंडू बाकी होता आणि संजय यादव स्ट्राइकवर होता.

हेही वाचा – एक नंबर बातमी! YouTube वर 500 सब्सक्रायबर्स झाल्यानंतर मिळणार पैसे

  • 19.6 – नो बॉल = 1 धाव
  • 19.6 – नो बॉल सिक्स = 7 धावा
  • 19.6 – नो बॉल, 2 धावा = एकूण 3 धावा
  • 19.6 – शेवटचा चेंडू वाईड – 1 धाव
  • 19.6 – शेवटचा चेंडू, सहा = 6 धावा

म्हणजेच शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अभिषेकला 5 चेंडू टाकावे लागले आणि त्याने एकूण 18 धावा दिल्या. अभिषेक भारताकडून एका चेंडूवर सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. एका चेंडूवर सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम क्लिंट मॅकॉयच्या नावावर आहे. ज्याने 2012-13 च्या बिग बॅश लीग हंगामात एका सामन्यात 1 चेंडूत 20 धावा दिल्या. दुसरीकडे या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर चेपॉक सुपर गिलीजचा संघ 52 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment