Mike Tyson vs Jake Paul : बॉक्सिंग दिग्गज माइक टायसन आणि लोकप्रिय यूट्यूबर बॉक्सर जेक पॉल यांच्यातील बहुप्रतिक्षित लढत जेक पॉलच्या विजयाने संपली. पॉलने टेक्सास येथील AT&T स्टेडियमवर झालेल्या आठ फेरीच्या चढाईत 58 वर्षीय टायसन ला पराभूत केले. वयानुसार पॉल या सामन्यात वरचढ वाटला, पण हा सामना फिक्स होता का? या कबस्टर लढतीच्या काही तास आधी सोशल मीडियावर सामन्याची बनावट स्क्रिप्ट समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
व्हायरल स्क्रिप्टनुसार, दोघांमधील सामना पॉलने टायसनला पाचव्या फेरीत पराभूत केल्याने संपणार होता. पण सामना आठव्या फेरीत संपला आणि पॉलने एकमताने निर्णय घेऊन 79-73 असा विजय मिळवला. 27 वर्षीय पॉलने आपल्या उत्कृष्ट गती आणि हालचालीचा वापर करून वयाने जास्त अशा टायसनवर सहज मात केली.
आता या लढतीतून बॉक्सर्स किती पैसे कमावणार हा या सामन्यापूर्वी चर्चेचा मुख्य मुद्दा होता. अनेक अहवालांनुसार, सामन्यासाठी एकूण बक्षीस रक्कम $60 मिलियन होती. फोर्ब्सच्या मते, जेक पॉलला $40 मिलियन (सुमारे 338 कोटी रुपये) आणि माइक टायसनला $20 मिलियन (सुमारे 169 कोटी रुपये) मिळाले.
Ain't no way bro. The script got leaked! 😂😂😂 #PaulVsTyson Jake Paul gonna knock out Mike Tyson! pic.twitter.com/5eA2ovYHsn
— Rivers Chomo (@gregorxsamsa) November 15, 2024
ही लढत नेटफ्लिक्सवर दाखवण्यात आली. त्यामुळे खूप लोकांनी नेटफ्लिक्स उघडले होते. पण लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. नेटफ्लिक्स अचानक भारत, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये बंद झाले. या सामन्याच्या लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान ही समस्या आली. आउटेजमुळे, हजारो वापरकर्त्यांना व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि ॲपमध्ये प्रवेश करण्यात समस्या आल्या. अनेकांनी बफरिंग होत असल्याच्या तक्रारीही केल्या.
आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट, 14,000 हून अधिक तक्रारी नोंदवल्या. मात्र, ही समस्या हळूहळू 5,100 अहवालांवर आली. असे नोंदवले गेले की 86% वापरकर्त्यांना व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये समस्या आल्या, तर 10% लोकांना सर्व्हर कनेक्शन आणि 4% ला लॉगिन समस्या होत्या.
हेही वाचा – आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये 13 वर्षाच्या खेळाडूवर लागणार बोली, कोण आहे तो?
भारतात ही समस्या रात्री साडेनऊ वाजता सर्वाधिक दिसून आली. या कालावधीत 1,200 हून अधिक वापरकर्त्यांनी तक्रारी केल्या. यापैकी 84% समस्या व्हिडिओ स्ट्रीमिंगशी संबंधित होत्या, 10% ॲप ऑपरेशनमध्ये समस्या होत्या आणि 8% वापरकर्त्यांनी वेबसाइटवर प्रवेश करण्यात समस्या नोंदवल्या.
माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील सामना नेटफ्लिक्सवर 65 मिलियन लोकांनी पाहिला. प्रमोटर मोस्ट व्हॅल्यूएबल प्रमोशनच्या मते, स्ट्रीमिंग 60 मिलियन घरांपर्यंत पोहोचली. ही संख्या ख्रिसमसच्या NFL गेमच्या ट्रॅफिकच्या दुप्पट आहे. नेटफ्लिक्सने ही मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे.
वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!