Virender Sehwag Pakistan Zindabhag Post In Marathi : वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या सेमीमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. पाकिस्तान बाहेर गेल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने गमतीशीर पद्धतीने डिवचले. भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी वर्ल्डकप खेळायला आलेल्या पाकिस्तानने पहिले दोन सामने जिंकले होते आणि नंतर भारताने त्यांना वाईट रीतीने पराभूत केले. यानंतर पाकिस्तानला अफगाणिस्तानडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.
मुलतानचा सुलतान म्हटल्या जाणार्या वीरेंद्र सेहवागने पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्रोल केले. त्याने एक पोस्ट शेअर केली. यात त्याने बाय बाय पाकिस्तानचे पोस्टर लावताना पाकिस्तान झिंदाभाग… असे म्हटले आहे. या पोस्टनंतर सेहवागने अजून एक पोस्ट केली. यात त्याने श्रीलंकेला टोमणा मारला. तो म्हणाला, ”पाकिस्तानची खास गोष्ट म्हणजे पाकिस्तान ज्या संघाला सपोर्ट करतो तो पाकिस्तानसारखा खेळू लागतो. सॉरी श्रीलंका.”
पाकिस्तानचा शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना शनिवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंडशी होणार आहे. आता चीफ सिलेक्टर इंझमाम उल हकच्या राजीनाम्यानंतर बाबर आझमलाही घरी पोहोचल्यानंतर शिक्षा होईल, असे मानले जात आहे.
हेही वाचा –कॅनरा बँकेने ग्राहकांना दिला मोठा शॉक, खिशावर होणार परिणाम!
पाकिस्तानसाठी वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य झाले आहे. सेमीमध्ये जाण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला 287 धावांनी विजय मिळवावा लागेल.किंवा त्यांना इंग्लंडचा डाव अवघ्या 13 धावांवर गारद करावा लागेल.
न्यूझीलंडने श्रीलंकेवर 160 चेंडू आणि 5 गडी राखून मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा नेट रन रेट (NRR) +0.743 वर गेला आहे. या विजयाने त्यांचे सेमीतील स्थान निश्चित झाले आहे. न्यूझीलंडने भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!