विराट कोहलीने शाकिब अल हसनला दिलं ‘खास’ गिफ्ट, आयुष्यात न विसरता येणारी गोष्ट!

WhatsApp Group

Virat Kohli Gifted Signed Bat to Shakib Al Hasan : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका संपली आहे. यात भारत अजिंक्य राहिला. सामन्यानंतर कानपूरच्या मैदानावर जे दिसलं ते खरच भावनि होतं. कारण त्या फोटोंमध्ये विराट कोहली बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला एक अविस्मरणीय गिफ्ट देताना दिसला. विराट कोहलीच्या या गिफ्टमागील कारण शाकिब अल हसनच्या निवृत्तीच्या निर्णयाशी संबंधित असू शकते.

कानपूर कसोटी सुरू होण्यापूर्वी शाकिब अल हसनने निवृत्ती जाहीर केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव घरच्या मैदानावर तो सामना खेळू शकला नाही, तर कानपूर ही त्याची शेवटची कसोटी ठरू शकते, असे तो म्हणाला होता. आता शाकिब पुढे काय पाऊल उचलणार? बांगलादेशला जाऊन कसोटी खेळणार की नाही? हे माहीत नाही पण शाकिब आता भारतात कसोटी खेळताना दिसणार नाही हे मात्र नक्की. त्याने आपली शेवटची कसोटी भारतीय भूमीवर खेळली आहे.

हेही वाचा – 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपयांचे अनुदान, महाराष्ट्र सरकारने जारी केले 2399 कोटी रुपये!

कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. हा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहलीने शाकिब अल हसनला त्याची बॅट भेट दिली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. विराटने त्याची सही केलेली बॅट शाकिबला भेट दिली.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत शकिबची कामगिरी

शाकिब अल हसनने बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या 4 डावात 66 धावा केल्या, ज्यात 32 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. गोलंदाजीत त्याने 4 बळी घेतले. ही मालिका शाकिबसाठी कामगिरीच्या दृष्टीने तितकीशी चांगली नव्हती हे स्पष्ट आहे. बांगलादेशविरुद्धची ही कसोटी मालिका विराट कोहलीसाठी चांगली गेली नाही. त्याने 4 डावात केवळ 100 धावा केल्या.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment