Virat Kohli’s Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगातील दिग्गज फलंदाज विराट कोहली शनिवारी (५ नोव्हेंबर) ३४ वर्षांचा झाला. सध्या तो ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळत आहे. कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेत शानदार फलंदाजी केली आहे. जगभरातील चाहते विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझींनी कोहलीचे अभिनंदन केले. दरम्यान ऑस्ट्रेलियात उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विराटसाठी केक आणला होता. विराटनेही त्यांचा आदर ठेवत केक कापला.
विराटने मेलबर्नमध्ये टीम इंडियासोबतही केक कापला. यादरम्यान टीम इंडियाचे मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. दोघांनी मिळून केक कापला. विराटचे ऑस्ट्रेलियातील बर्थड़े सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Moment to cherish for travelling Indian media as @imVkohli cuts cake with them on his 34th birthday at @MCG #HappyBirthdayViratKohli #KingKohliBirthday pic.twitter.com/CiM29atkoS
— XtraTime (@xtratimeindia) November 5, 2022
हेही वाचा – Virat Kohli’s Birthday : विराटच्या बर्थडेनिमित्त अनुष्काने शेअर केले ‘न पाहिलेले’ फोटो!
Indian sports journalists celebrated Virat Kohli's birthday in Melbourne.
Don't miss Kohli's expression after having the cake and seeing the special gift pic.twitter.com/6nnl9L2gvS
— Aritra Mukherjee (@aritram029) November 5, 2022
Virat Kohli cutting his birthday cake at the MCG @imVkohli pic.twitter.com/EWOpX7tli3
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) November 5, 2022
Birthday celebrations ON in Australia 🎂 🎉
Happy birthday @imVkohli & @PaddyUpton1 👏 👏 #TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/sPB2vHVHw4
— BCCI (@BCCI) November 5, 2022
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात रविवारी मेलबर्नमध्ये सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सामना सुरू होईल. हा सामना जिंकून भारत उपांत्य फेरीत पोहोचेल आणि उपांत्य फेरीत त्यांचा सामना कोणाशी होणार हे निश्चित होईल.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.