चॅम्पियन्स ट्रॉफी : चेसमास्टर विराट कोहलीचे शतक, भारताची पाकिस्तानवर अगदी सहज मात

WhatsApp Group

IND vs PAK : विराट कोहलीच्या सुंदर शतकाच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला अगदी सहज ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. टॉस गमावून भारताने पाकिस्तानला २४१ धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान ४२.३ षटकातच पूर्ण केले. विराटची हे करियरचे ८२वे आंतरराष्ट्रीय शतक तर ५१वे वनडे शतक ठरले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

विराट कोहलीचे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिले शतक आहे. यासह कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये १४००० धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात इतक्या धावा करणारा कोहली हा जगातील तिसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी एकदिवसीय सामन्यात १४००० धावा केल्या आहेत.

हेही वाचा – अब्रार अहमदचा शुबमन गिलला ‘तिखट’ सेंडऑफ, विकेट काढल्यानंरचं सेलिब्रेशन एकदा बघाच!

भारत जवळजवळ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता २ मार्च रोजी गटातील शेवटच्या सामन्यात त्यांचा सामना न्यूझीलंडशी होईल.

सर्वाधिक झेल  

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. तो एकूण यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीने २९९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५८ झेल घेतले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment