‘हा’ मराठी माणूस देतोय विनोद कांबळीला नोकरी..! १ लाख असणार पगार; वाचा!

WhatsApp Group

Vinod Kambli job offer : काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची आर्थिक अवस्था समोर आली होती. त्याला कामाची गरज होती. त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, बीसीसीआयकडून दरमहा मिळणाऱ्या ३०,००० रुपयांमध्ये तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही. कांबळीचं म्हणणं ऐकून महाराष्ट्रातील संदीप थोरात या व्यावसायिकानं पुढे येऊन त्याला एक लाख रुपये मासिक पगाराची नोकरी देऊ केली आहे.

कुठं मिळालीय नोकरी?

अनेक मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार कांबळीला मात्र क्रिकेटशी संबंधित ही नोकरी मिळालेली नाही. त्यांना ऑफर केलेली नोकरी मुंबईस्थित सह्याद्री उद्योग समूहाच्या वित्त विभागाची आहे. या कामावर आतापर्यंत माजी क्रिकेटपटूकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जरी लोक या कामावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा – OMG..! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी भारताला ४४० व्होल्टचा धक्का; द्रविडची साथ तुटणार?

एकेकाळी क्रिकेटच्या खेळपट्टीवर सगळ्यांना तोडणारा कांबळी लाखोंमध्ये कमवायचा, पण सध्या तो आर्थिक विवंचनेशी झुंजत आहे. “मला नोकरीची गरज आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडं गेलो होतो. मला माझं घर चालवायचं आहे”, असं कांबळीनं म्हटलं. मिड डेच्या वृत्तानुसार, सध्या कांबळीला बीसीसीआयकडून मासिक ३०,००० रुपये पेन्शन (बीसीसीआय पेन्शन) वर जगावं लागतं. म्हणजेच त्याचं दररोजचं उत्पन्न फक्त १००० रुपये आहे.

विनोद कांबळीची एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीची एकूण संपत्ती १ ते १.५ मिलियन डॉलर्स दरम्यान आहे. २०२२ च्या सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार, त्याचं वार्षिक उत्पन्न केवळ चार लाख रुपये राहिलं आहे. मात्र, मुंबईत त्याचं स्वतःचं घर आहे. पण देशाच्या आर्थिक राजधानीत राहण्यासाठी हे अपुरं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे रेंज रोव्हर कार आहे.

कोरोना नंतर बदलली परिस्थिती

क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही त्याच्याकडं काही काळ कमाईची अनेक साधनं होती. त्यानं क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री केली, जाहिरातींमध्ये काम केलं. त्यामुळं त्याला भरपूर पैसे मिळत गेले. इतकंच नाही तर चित्रपटांमध्ये अभिनय करत कमाईही केली. पण कालांतरानं त्याची कमाई संपली. कोरोना महामारीपासून त्याची परिस्थिती बिकट होत आहे.

हेही वाचा – ही बातमी प्रत्येक भारतीयासाठी..! आपल्याला लागलंय ‘मीम्स’ पाहण्याचं वेड; रोज खर्च होतोय ‘इतका’ वेळ!

कांबळीचं करियर…

विनोद कांबळीनं भारतासाठी एकूण १०४ एकदिवसीय आणि १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३५६१ धावा केल्या आहेत, ज्यात कसोटीमध्ये चार शतकं आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतकं आहेत. कांबळीनं १९९१ मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले होते, तर २००० मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

Leave a comment