विनेश फोगाटची रिटायरमेंट! म्हणाली, “माझ्यात आता यापेक्षा जास्त ताकद नाही, अलविदा कुस्ती..”

WhatsApp Group

Vinesh Phogat Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा केला आहे. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर गुरुवारी निवृत्ती जाहीर केली. तिने एक भावनिक मेसेज शेअर केला.

बुधवारी विनेशला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 किलो फ्रीस्टाईल फायनलमधून अपात्र ठरवण्यात आले. 29 वर्षीय कुस्तीपटू विनेश फोगटचे वजन अंतिम सामन्याच्या दिवशी निर्धारित मर्यादेपेक्षा किंचित जास्त असल्याचे आढळले, त्यानंतर तिला या परिणामाला सामोरे जावे लागले.

विनेश फोगटने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची माफी मागितली आणि सांगितले की आता तिची हिंमत सुटली आहे आणि ती आता कुस्ती खेळू शकत नाही. ती म्हणाली, ”आई, कुस्ती जिंकली, मी हरले. मला माफ कर. तुझी स्वप्नं, माझी हिम्मत सगळं तुटलं. माझ्यात आता यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन. क्षमा असावी.”

हेही वाचा – विनेश फोगाटने रचला इतिहास! पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक, चौथं मेडल पक्कं!

निवृत्तीपूर्वी, विनेश फोगाटने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरल्याच्या विरोधात क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) अपील केले आणि तिला संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली. भारतीय दलात समाविष्ट असलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) सूत्राने याला दुजोरा दिला.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment