विनेश फोगाटने रचला इतिहास! पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक, चौथं मेडल पक्कं!

WhatsApp Group

Vinesh Phogat : भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. विनेशने महिला फ्रीस्टाइल 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये धडक दिली आहे. यासह भारताचे पदक निश्चित झाले आहे. विनेश ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली.

सेमीफायनलच्या बाऊटमध्ये विनेशने क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. सामन्याचा पहिला पहिला कालावधी खूप तणावपूर्ण होता, त्यात कोणीही पूर्णपणे वर्चस्व गाजवले नाही. मात्र, यादरम्यान विनेशने 1-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या कालावधीच्या सुरुवातीला विनेशने सलग 2-2 गुण मिळवत 5-0 अशी आघाडी घेतली.

हेही वाचा – पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना, अर्ज करण्याचे आवाहन

तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या 29 वर्षीय विनेशने मंगळवारी आपल्या मोहिमेला सुरुवात केली. विनेशने तिच्या पहिल्याच सामन्यात विद्यमान ऑलिम्पिक आणि 4 वेळा विश्वविजेती जपानच्या युई सुसाकीचा पराभव करून खळबळ उडवून दिली. विनेशच्या या विजयाची कोणालाही अपेक्षा नव्हती कारण 25 वर्षीय सुसाकीने तिच्या 82 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकही सामना गमावला नव्हता. हा तिचा पहिला पराभव होता. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 असा पराभव केला.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment