RutuRaj Gaikwad 7 Sixes In An Over : महाराष्ट्राचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी २०२२च्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध इतिहास रचला. गायकवाडने १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची नाबाद खेळी खेळली ज्यात त्याने १० चौकार आणि १६ षटकार मारले. एवढेच नाही तर या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आणखी एक विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंगला एका षटकात ७ षटकार ठोकले आणि धावांचा पाऊस पाडला.
हो, एका षटकात ७ षटकार. हा सर्व प्रकार महाराष्ट्राच्या डावाच्या ४९व्या षटकात घडला. या षटकात शिवा सिंगनेही नो बॉल टाकला ज्यात ऋतुराजनेही शानदार षटकार ठोकला. ऋतुराज गायकवाडच्या दहशतीने गोलंदाज पूर्णपणे हादरला. गायकवाडच्या द्विशतकामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ५ गडी गमावून ३३० धावा केल्या.
हेही वाचा – Delhi Murder : दिल्लीत ‘मोठं’ हत्याकांड..! मुलासह आईला अटक; बापाचे तुकडे केले आणि…!
Ruturaj Gaikwad smashed seven sixes in an over!!
YES, YOU READ IT CORRECT 🤯🤯
📸: Disney + Hotstar pic.twitter.com/OUii4aQyAx
— CricTracker (@Cricketracker) November 28, 2022
RutuRaj Gaikwad 43 Runs in an over including 7 Sixes
Heighest score any batsmen in single over in the world @Ruutu1331 🔥❤️#RuturajGaikwad #VijayHazareTrophy2022 #MAHvUP
pic.twitter.com/cZHvTg8zsI— చంటిగాడు లోకల్😎 (@Harsha_offll2) November 28, 2022
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आगामी आयपीएल हंगामासाठी ऋतुराज गायकवाडला कायम ठेवले आहे आणि आता त्याची कामगिरी पाहून चेन्नईचे सर्व चाहते खूप खूश होतील. २२० धावांच्या या नाबाद खेळीने सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियावरही गायकवाड यांचे जोरदार कौतुक होत आहे.