Video : “तुला BCCI चा अध्यक्ष व्हायला आवडेल का?”, सचिन तेंडुलकरनं दिलं मजेशीर उत्तर!

WhatsApp Group

Sachin Tendulkar On BCCI President : नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३ मध्ये ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपले मनोगत व्यक्त केले. सचिनने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी, एकदिवसीय विश्वचषक यापासून एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दलही मत दिले, यासोबतच त्याने आगामी BCCIचा अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावरही दिलखुलास उत्तर दिले.

सचिन होणार BCCIचा पुढील अध्यक्ष?

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केले आहे. सचिनही या पदावर कधी येईल का? या प्रश्नाला सचिन तेंडुलकरने मजेशीर उत्तर दिले. सचिन म्हणाला, ”मी वेगवान गोलंदाजी करत नव्हतो. जेव्हा गांगुली खेळायचा तेव्हा तो विकेट घेत होता. तेव्हा तो १४० किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकण्याबद्दल बोलायचा. पण नंतर त्याच्या पाठीत समस्या आली. मी काही १४० च्या वेगाने गोलंदाजी करत नाही.”

सध्या माजी वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष आहे. तर गांगुली त्यांच्याअगोदर अध्यक्ष होता. बीसीसीआयचे हे अध्यक्ष गोलंदाजी करायचे, म्हणून सचिनने अशा आशयात उत्तर दिले. थोडक्यात सचिनने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा प्रश्न एक प्रकारे टाळला आहे.

हेही वाचा – IAF Agniveer Recruitment 2023 : भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू..! ही घ्या रेजिस्ट्रेशन लिंक

महिला क्रिकेट लीगवर सचिन काय म्हणाला?

महिला प्रीमियर लीगबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला, ”बीसीसीआयने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, बीसीसीआयने आपले काम केले आहे आणि आता महिला क्रिकेटला पाठिंबा देण्याची आपली पाळी आहे. ही एक सुरुवात आहे आणि आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आयुष्यात तुम्हाला हिरो हवा आहे, ज्याची पूजा करून आपण मोठे होतो. सायना, मेरी कोम, सिंधू, पीटी उषा यांनी हे काम केले आहे.”

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला असला तरी क्रिकेट चाहत्यांमध्ये अजूनही त्याची क्रेझ आहे. सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत, जे मोडणे कठीण आहे. सचिन तेंडुलकरने भारतासाठी 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा केल्या आहेत, त्याची 51 कसोटी शतके आहेत. सचिनच्या नावावर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18426 धावा आहेत, ज्यामध्ये 49 शतके आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा आणि आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment