Hero MotoCorp आता भारतीय बाजारपेठेत नवीन पॅशन Xpro (Hero Passion Xpro) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ही कंपनीची परवडणारी आणि उत्तम मायलेज देणारी बाइक असेल. कंपनीने टीव्ही आणि डिजिटल जाहिरातींसाठी या नवीन बाइकचे शूटिंग सुरू केले आहे. नवीन पॅशन एक्सप्रोमध्ये काही मोठे बदल झाले आहेत. याला एक नवीन हेडलॅम्प मिळतो आणि स्प्लिट डिझाइन मिळते, ज्यामुळे ते स्पोर्टी दिसते. त्याच्या दोन लाइठमध्ये ‘H’ आकाराचा DRL देखील आहे.
BikeWale च्या रिपोर्टनुसार, नवीन बाईक Passion XPro जाहिरातींसाठी शूट केली जात आहे, त्यादरम्यान काही फोटो समोर आले आहेत. नवीन बाईकमध्ये विंडस्क्रीनची नवीन रचना असेल जी पूर्ण काळ्या रंगात येईल. इंधन टाकीच्या काऊलमध्येही डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे बाइकला नवीन लुक देण्यात आला आहे. नवीन मॅट फिनिश पेंट स्कीममुळे बाइक अधिक आकर्षक बनवण्यात आली आहे. नवीन पॅशन एक्सप्रो लवकरच लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या बाईकचे मायलेज 60 किमी आहे.
हेही वाचा – Automatic Car : ऑटोमॅटिक कार खरेदी करताय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे आणि 3 तोटे!
Hero Passion XPro to make a comeback!
Spotted recently during its TVC shoot, the commuter will return with quite a few updates:
➡️ LED headlight with H-shaped DRL
➡️ Revised styling
➡️ Matte finish paint scheme
➡️ Bluetooth connectivity
➡️ OBD2-compliantPC: bikewale pic.twitter.com/GzZzlY25bP
— evoIndia (@evoIndia) May 2, 2023
नवीन बाइक 110cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे जी 7000rpm वर सुमारे 8bhp आणि 5500rpm वर 9Nm पीक टॉर्क निर्माण करते. ही बाईक 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. या नवीन बाईकच्या लॉन्चची तारीख काही महिन्यांत जाहीर केली जाऊ शकते.
संभाव्य किंमत आणि स्पर्धा
नवीनतम मॉडेलची किंमत त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ही मोटरसायकल 70-75 हजार रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत येईल अशी अपेक्षा आहे. ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत TVS Star City Plus, Honda Shine 100 आणि Bajaj Platina 110 शी स्पर्धा करेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!