IPL : आयपीएल संघाचा भाग असलेल्या एका खेळाडूवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित गोलंदाजावर तिच्या वहिणीनेच आरोप केले आहेत, ती एक महिला कॉन्स्टेबल आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा खेळाडू आयपीएल 2023 मध्येही खेळला आहे. त्याच्या संघाला प्लेऑफच्या पुढे प्रगती करता आली नाही. गेल्या मोसमानंतर हा खेळाडूही बराच काळ दुखापतग्रस्त होता. प्रयागराजमधील शिवकुटी पोलीस ठाण्यात खेळाडू ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोप करणारी महिला वाराणसीची असून ती सध्या प्रयागराजमधील शिवकुटी पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे. पीडितेने सांगितले की, 2018 मध्ये तिचा वाराणसीमध्ये बौद्ध विधीनुसार विवाह झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्लीचा रहिवासी असून तो सध्या संभल येथील पोलीस विभागात तैनात आहे. आरोपी आधीच विवाहित असल्याची बाबही समोर येत आहे, मात्र ही बाब पीडितेपासून लपवण्यात आली. त्यानंतर काही दिवस तिचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला.
हेही वाचा – 1.5 टनचा AC रोज 8 तास चालवला, तर किती बिल येईल? जाणून घ्या गणित!
2019 मध्ये अत्याचार
या छळाला कंटाळून ती आपल्या माहेरच्या घरी गेल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. 2019 मध्ये पतीने तिची समजूत घातली आणि तिला सोबत नेले. जुलै 2019 मध्ये, आयपीएल क्रिकेटर आणि भावोजीने तिच्या सासरच्या घरी एका कार्यक्रमादरम्यान तिच्यावर अत्याचार केला. याबाबत तिने पतीला सांगितल्यावर पीडितेला बेदम मारहाणही करण्यात आली. एवढेच नाही तर तिचा 3 वर्षांचा मुलगा आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
नुकताच आयपीएल खेळलेला नेपाळचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप लामिछाने याच्यावरही अत्याचाराचा आरोप झाला होता. यानंतर त्याला अनेक महिने तुरुंगात राहावे लागले. तो सध्या जामिनावर बाहेर असून विश्वचषक पात्रता फेरीच्या तयारीत व्यस्त आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!