टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियानं साधला ‘डाव’; भारताविरुद्ध खेळणार ‘मुंबई’चा खेळाडू!

WhatsApp Group

Australia’s Squad For T20 World Cup 2022 : क्रिकेट ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आणि २०२२ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं १५ जणांचा संघ जाहीर केला असून, त्यात एका नावानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं धोकादायक अष्टपैलू खेळाडू असलेल्या आणि सिंगापूरमध्ये जन्मलेल्या टिम डेव्हिडचा संघात समावेश केला आहे. टी-२० वर्ल्डकप आणि भारत दौऱ्यासाठी निवडलेल्या या संघात स्टीव्ह स्मिथलाही स्थान मिळालं आहे, तर कर्णधार आरोन फिंच कायम राहणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मजबूत कांगारू संघ निवडला आहे. त्यात मुख्यतः त्याच खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी गेल्या वर्षी यूएई मध्ये टी-२० वर्ल्डकप खेळला होता आणि ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला होता.
टिम डेव्हिडला या संघात स्थान मिळालं आहे, ज्यानं मार्च २०२० पर्यंत सिंगापूर संघासाठी ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये देखील दिसला आणि त्यानं मुंबई इंडियन्ससाठी ९ सामने खेळले. मात्र, काही सामने वगळता अनेक सामन्यांमध्ये त्याची फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्यानं सर्वांना प्रभावित केलं.

हेही वाचा –  IND Vs HK : ७-८ पावलांचा रनअप आणि वाकडी अ‍ॅक्शन..! ६ वर्षानंतर विराटनं टाकली बॉलिंग; दिल्या ‘इतक्या’ धावा!

टिम डेव्हिडचे आई-वडील ऑस्ट्रेलियन आहेत, पण तो दोन वर्षांचा असताना त्याचं कुटुंब पर्थहून सिंगापूरला गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितलं, की ते आयसीसीच्या नियमांनुसार तत्काळ प्रभावानं ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यास तयार आहेत. मिशेल स्वेप्सनच्या जागी टिम डेव्हिड ऑस्ट्रेलियन संघात निवडला गेला आहे. डेव्हिड वॉर्नर भारत दौऱ्यावर जाणार नसल्याचंही क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितले आहे. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वॉर्नरच्या जागी कॅमेरून ग्रीन भारत दौऱ्यावर जाणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२२ कुठं खेळवला जाईल?

ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील एकूण सात ठिकाणी स्पर्धेचे सामने खेळवले जातील. जिलॉन्ग शहरातील कार्डिनिया पार्क येथे पहिल्या फेरीतील सहा सामने खेळवले जातील. त्याच वेळी, बॉबार्टच्या बेलेरिव्ह ओव्हलवर एकूण नऊ सामने खेळवले जातील, त्यापैकी पहिल्या फेरीतील सहा आणि सुपर १२ टप्प्यातील तीन सामने खेळले जातील. या स्पर्धेतील पहिला सामना १६ ऑक्टोबर रोजी श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात होणार आहे. हा ग्रुप स्टेजचा सामना आहे. सुपर-१२ चे सामने २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.

हेही वाचा – सारा तेंडुलकर नाही, सारा अली खानसोबत फिरतोय शुबमन गिल? VIDEO व्हायरल!

सुपर १२ चे उर्वरित सामने या स्टेडियममध्ये खेळले जातील :

  • गाबा, ब्रिस्बेन
  • पर्थ स्टेडियम, पर्थ
  • अॅडलेड ओव्हल, अॅडलेड
  • सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी
  • मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न

ऑस्ट्रेलियाचा संघ

आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment