IPL 2024 ऑक्शन संदर्भात ‘मोठी’ बातमी! कधी, कुठे होणार? जाणून घ्या

WhatsApp Group

IPL 2024 Auction In Marathi : सध्या भारतात आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 खेळला जात आहे, ज्याचा समारोप 19 नोव्हेंबरला होणार आहे. विश्वचषकादरम्यान आयपीएल 2024 (IPL 2024) संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावेळी परदेशात आयपीएल लिलाव आयोजित करू शकते. गेल्या वर्षी हा लिलाव केरळमधील कोची येथे झाला होता. आता हा लिलाव स्वप्नांच्या दुबई शहरात होऊ शकतो. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी खेळाडूंचा बाजार डिसेंबरमध्ये दुबईमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. बीसीसीआयने आयपीएल 2023 लिलाव इस्तंबूलमध्ये आयोजित करण्याचा विचार केला होता परंतु नंतर कोचीला अंतिम रूप दिले.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय 15 ते 19 डिसेंबर दरम्यान लिलाव करू शकते. हा एक आठवड्याचा दिवस असूनही, 18 किंवा 19 डिसेंबर रोजी कार्यक्रम होण्याची अधिक शक्यता आहे. फ्रेंचायझींना अधिकृत माहिती देण्यात आलली नाही, तरी आयपीएलचा लिलाव दुबईत होणार असल्याची चर्चा आहे. दुबईची योजना तात्पुरती असू शकते परंतु सर्व आयपीएल फ्रेंचायझींना दुबई हे लिलावाचे ठिकाण बनवण्याच्या योजनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. ट्रेडिंग विंडो सध्या खुली आहे. मात्र, आतापर्यंत आयपीएल फ्रेंचायझींमध्ये खेळाडूंच्या देवाणघेवाणीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा –विश्वविजेत्या इंग्लंडचा सर्वात वाईट पराभव, श्रीलंकेची चोख कामगिरी!

दुसरीकडे, महिला प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्राचा लिलाव 9 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. WPL लिलाव भारतात होणे अपेक्षित आहे. बीसीसीआयने अद्याप मालकांना डब्ल्यूपीएल लिलावाचे ठिकाण आणि तारखांची माहिती दिलेली नाही. ही लीग यावर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. भारतीय महिला संघाची जानेवारीच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय बांधिलकी आहे. यावेळीही डब्ल्यूपीएल एकाच शहरात होणार की वेगवेगळ्या ठिकाणी घेण्याचा निर्णय होणार? सध्या संघांकडून याला दुजोरा मिळालेला नाही. गेल्या वर्षी डब्ल्यूपीएलचा पहिला सीझन मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment