IND vs PAK : सातासमुद्रापार खेळवली जाणार भारत-पाकिस्तान टेस्ट मॅच? जाणून घ्या काय घडलंय…

WhatsApp Group

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ (IND vs PAK) या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात आमनेसामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. तो सामना पाहण्यासाठी विक्रमी संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले. त्या सामन्यातील अफाट यश पाहून मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC) आता दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना आयोजित करण्याचा विचार करत आहे. एमसीसी आणि व्हिक्टोरिया सरकार, जे एमसीजीच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवते, यांनी अलीकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्या यजमानपदाबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सोबत चर्चा केली आहे.

नक्की प्रकरण काय?

MCC चे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी ऑक्टोबरमध्ये येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक सामन्यातील जबरदस्त यश लक्षात घेऊन भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात स्वारस्य दाखवले आहे. या दोन देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात ९० हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. फॉक्सने सेन रेडिओला सांगितले, “एमसीजीमध्ये सलग तीन कसोटी सामने खेळणे निश्चितच छान होईल. स्टेडियम प्रत्येक वेळी खचाखच भरले जाईल. याबाबत आम्ही माहिती घेतली आहे. याबाबत आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. मला माहीत आहे (व्हिक्टोरिया) सरकारनेही तेच केले आहे. मला माहीत आहे की व्यस्त वेळापत्रकात हे खूप क्लिष्ट आहे म्हणून मला विश्वास आहे की हे कदाचित एक मोठे आव्हान आहे.”

हेही वाचा – Free Ration : आता सर्वांना मिळणार नाही मोफत धान्य..! गरीब कल्याण योजनेत बदल; वाचा नवीन नियम

२००७ मध्ये शेवटची मालिका

फॉक्स म्हणाले, ”क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) चर्चा करावी. क्रिकेट ऑस्ट्रेलिया याबाबत आयसीसीशी बोलणे सुरूच ठेवेल आणि त्यासाठी आग्रही राहील अशी अपेक्षा आहे. जेव्हा तुम्हाला जगभरातील अनेक स्टेडियम रिकामे दिसतात, तेव्हा मला वाटते की खचाखच भरलेले स्टेडियम आणि तेथील वातावरण खेळासाठी चांगले असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका शेवटची २००७ मध्ये खेळली गेली होती. यानंतर त्यांचा सामना फक्त आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धेत झाला आहे.”

राजकीय कारणांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून बंद आहे. उभय संघांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२ मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. त्यानंतर दोन्ही संघ कधीही द्विपक्षीय मालिकेत भिडले नाहीत. मात्र, या काळात ते आयसीसी स्पर्धांमध्ये नक्कीच एकमेकांसमोर आले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment