Video : गजब बेइज्जती है यार..! भर पत्रकार परिषदेत बाबर आझमचा अपमान; पाहा काय घडलं!

WhatsApp Group

Journalist Insulted Babar Azam : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली आहे. सरफराज अहमदने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात उत्कृष्ट शतक झळकावले. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नव्हता आणि पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध त्यांची निराशा झाली आहे. बाबर आझम पुन्हा एकदा टीकेचे धनी झाला आहे. असाच काहीसा प्रकार सामना संपल्यानंतर झाला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने बाबरला खडतर प्रश्न विचारला.

नक्की काय घडलं?

पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराने बाबरला विचारले, “काही लोक म्हणतात की तुझी संघावरील पकड कमजोर होत आहे. पाकिस्तान संघात मैत्री आणि मैत्रीची मालिका संपुष्टात येत आहे.” यानंतर बाबरने अडवून विचारले, “कोणते मित्र?” पत्रकार न थांबता पुढे म्हणाला, “शाहिद आफ्रिदी जेव्हापासून संघात आला तेव्हापासून त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील उपकर्णधार बदलला आहे. ती जागा शान मसूदही भरू शकतो. आणि आता तुझ्याकडून कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद हिरावून घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.”

हेही वाचा  – Electric Scooter : फक्त १९४७ रुपयांमध्ये बुक करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर; धावेल ३०० किमी! किंमत आहे ‘इतकी’

तेव्हा बाबरने उत्तर दिले, “सर, कर्णधार कोण असेल हे तुम्हाला माहीतच असेल. मला काही फरक पडत नाही. माझे काम मैदानात जाऊन कामगिरी करणे आणि संघाकडून चांगली कामगिरी करवून घेणे हे आहे.” बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. पण त्याला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. बाबर आझम आणि त्याची टीम आता २०२३ च्या विश्वचषकाची तयारी सुरू करणार आहे. २०२३ चा विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment