ब्रेकिंग न्यूज…! टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा कॅप्टन

WhatsApp Group

Team India’s squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर दुपारी हॉटेलमध्ये पोहोचले. याआधी आगरकरने दिल्लीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचीही भेट घेतली होती. यावेळी आयसीसी टी-20 वर्ल्डकप 1 ते 29 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.

ऋषभ पंत मुख्य यष्टीरक्षक

कार अपघातानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये परतलेल्या ऋषभ पंतने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टी-20 वर्ल्डकपचे तिकीट पटकावले. निवडकर्त्यांनी त्याला मुख्य यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान दिले आहे.

हेही वाचा – कोविशिल्ड लसीमुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका; ब्रिटीश कोर्टात कंपनीची कबुली!

टी-20 वर्ल्डकप 2024 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
राखीव : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment