चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्मा कॅप्टन आणि ‘हा’ वाइस…

WhatsApp Group

Team India Squad for Champions Trophy 2025 : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसेल. तर, शुबमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. विराट कोहलीलाही संघात संधी मिळाली आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. संघ 12 जानेवारी रोजीच येणार होता पण बीसीसीआयने आयसीसीकडून आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती.

पाकिस्तान वगळता सर्व संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. पाकिस्तानही काही दिवसांत आपला संघ जाहीर करेल. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान आहे पण भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. बीसीसीआयने आधीच सांगितले होते की ते त्यांचे खेळाडू पाकिस्तानला पाठवणार नाहीत. अशा परिस्थितीत, आयसीसीला या स्पर्धेसाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारावे लागले.

टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करेल. भारत 20 फेब्रुवारी रोजी पहिला सामना खेळेल. यानंतर टीम इंडियाला पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. भारताला 2 मार्च रोजी गटातील शेवटचा सामना खेळायचा आहे. जर भारत दुसऱ्या उपांत्य फेरीत पोहोचला तर सामना लाहोरवरून दुबईला हलवला जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!  

Leave a comment