वर्ल्डकपपूर्वी भारताला तिसरा धक्का…! ‘स्टार’ खेळाडू संघाबाहेर; त्याच्या जागी ‘हा’ खेळणार!

WhatsApp Group

Deepak Chahar T20 World Cup 2022 Update : टी-२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या दीपक चहरबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. चहरला टी-२० वर्ल्डकपमधून वगळण्यात आल्याचे स्पोर्ट्स तकने म्हटले आहे. स्टँडबाय म्हणून त्याचा वर्ल्डकप संघात समावेश करण्यात आला होता.

रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडणारा दीपक चहर हा तिसरा खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या काही सामन्यांमध्ये त्याने नवीन चेंडूने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, त्यावरून तो बुमराहच्या जागी खेळू शकेल अशी अटकळ बांधली जात होती परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीने NCA फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि तो ऑस्ट्रेलियाला परतण्यास तयार आहे. लवकरच बुमराहच्या जागी त्याच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरही ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.

हेही वाचा – IND Vs SA : शेवटच्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा पालापाचोळा..! भारतानं मालिका २-१ नं जिंकली

शार्दुल ठाकूर घेणार चहरची जागा

आता चहरऐवजी शार्दुल ठाकूरचा त्याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरने वर्ल्डकप संघात संधी न मिळाल्याने निराशा व्यक्त केली होती. शार्दुलशिवाय मोहम्मद सिराजही पहिल्या संघाचा भाग नव्हता.

Leave a comment