WTC Final 2023 : टीम इंडियाने रचला इतिहास..! सलग दुसऱ्यांदा गाठली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल

WhatsApp Group

World Test Championship 2023 : भारतीय संघाने इतिहास रचत सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final 2023) धडक मारली आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे, त्याच दरम्यान न्यूझीलंडमधील एका सामन्यातून ही आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना संपला आहे, ज्यामध्ये न्यूझीलंडने २ गडी राखून विजय मिळवला आहे आणि यासह टीम इंडिया WTC २०२३ फायनलसाठी पात्र ठरली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे, जे आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ ते ११ जून या कालावधीत होणार असून १२ जून रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी राखीव जागाही ठेवण्यात आली आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्याला न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

न्यूझीलंडची श्रीलंकेवर २ विकेट्सने मात

इंदूर कसोटीत भारताच्या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे समीकरण रंजक बनले होते आणि टीम इंडियाला अंतिम तिकिटासाठी काही काळ वाट पाहावी लागली होती. इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाचे स्थान पक्के झाले, पण भारताचे अवलंबित्व श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी सामन्यावर राहिले. श्रीलंका सध्या न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे, त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी मालिका २-० ने जिंकणे आवश्यक होते, जे होऊ शकले नाही.

हेही वाचा – Oscar Award : तुम्हाला माहितीये…ऑस्कर पुरस्काराची किंमत? एक लिटर पेट्रोलपेक्षाही कमी!

 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ मध्ये टीम इंडिया

भारताने या चॅम्पियनशिपमध्ये एकूण १८ सामने खेळले, १० जिंकले आणि ५ गमावले. तर ३ टेस्ट अनिर्णित राहिल्या. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये नंबर-२ वर कायम आहे, तर ऑस्ट्रेलिया १९ मॅचमध्ये ११ विजय मिळवून नंबर-१ वर कायम आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघाला ६-६ मालिका खेळायच्या होत्या, ज्यामध्ये ३ मायदेशात आणि ३ परदेशात होत्या.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे पॉइंट टेबल-

  • ऑस्ट्रेलिया – विजयाची टक्केवारी ६८.५२, ११ विजय, ३ पराभव, ४ अनिर्णित
  • भारत – विजयाची टक्केवारी ६०.२९, १० विजय, ५ पराभव, २ अनिर्णित
  • दक्षिण आफ्रिका – विजयाची टक्केवारी ५५.५६ , ८ विजय, ६ पराभव, १ अनिर्णित
  • श्रीलंका – विजयाची टक्केवारी ४८.४८ , ५ विजय, ५ वेळा, १ अनिर्णित

अंतिम सामना कधी होईल?

  • संघ – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • दिनांक – ७ ते ११ जून २०२३
  • स्थळ – ओव्हल, लंडन
  • राखीव दिवस – १२ जून

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment