World Cup 2023 : टीम इंडियाला मिळाला शुभ संकेत, वर्ल्डकप आपलाच असणार!

WhatsApp Group

Cricket World Cup 2023 Team India : क्रिकेटप्रेमींच्या प्रतिक्षेचा क्षण संपण्याच्या अगदी जवळ आला आहे. विश्वचषक 2023 सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. लोकांना आशा आहे, की रोहित आणि कंपनी 2011 प्रमाणे घरच्या मैदानावर करिष्माई कामगिरी करून विजेतेपद मिळवू शकेल. यावेळीही योगायोग असाच आहे. विश्वचषकाच्या मागील तीन हंगामांवर नजर टाकली तर यजमान संघाला यश मिळाले आहे. यावेळी ही प्रतिष्ठित स्पर्धा भारतात आयोजित केली जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकपची चॅम्पियन बनू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

2019 मध्ये इंग्लंड चॅम्पियन

विश्वचषक स्पर्धेचा शेवटचा हंगाम 2019 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला गेला होता. येथील यजमान संघाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. अंतिम सामन्यात इंग्लिश संघाचा सामना न्यूझीलंडशी लॉर्ड्सवर झाला. येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघ 241 धावा करण्यात यशस्वी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघही 241 धावांवर गारद झाला. त्यानंतर सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लागला. येथे यजमान संघ इंग्लंडला विजय मिळवण्यात यश आले.

हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची मजा, भाव वाढले! वाचा आजचा दर

2015 मध्ये ऑस्ट्रेलिया

विश्वचषक 2015 ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला होता. येथे कांगारू संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने 183 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 33.1 षटकांत तीन विकेट्स गमावून सामना जिंकला.

2011 चा विश्वचषक

2011 चा विश्वचषक आशिया खंडात आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेतील बहुतांश सामने भारतात खेळले गेले. अंतिम सामन्यात भारताचा सामना वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेशी झाला. येथे श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 276 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 10 चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद होती. ब्लू टीमने इतिहास रचला आणि धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर कब्जा केला. धोनीच्या आधी टीम इंडियाने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment