VIDEO : मास्क लावून, कॅमेरा घेऊन तो लोकांमध्ये गेला, पण कोणीच ओळखलं नाही!

WhatsApp Group

Team India Cricketer With Mumbaikars At Marine Lines : भारतीय क्रिकेट संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील आपला पुढील सामना गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा एक खेळाडू कॅमेरामन म्हणून मुंबईच्या रस्त्यांवर आणि समुद्र किनाऱ्यावर लोकांच्या मुलाखती घेताना दिसला. अनेकांना त्याला ओळखता आले नाही, पण काही लोकांनी त्याला ओळखले आणि नंतर फोटोही क्लिक केले. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही त्याला एकदाही ओळखू शकला नाही. हा खेळाडू दुसरा कोणी नसून मुंबईकर सूर्यकुमार यादव आहे.

बीसीसीआयने मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर सूर्यकुमार यादवसोबत एक मजेदार व्हिडिओ बनवण्याची योजना आखली होती. त्याचे टॅटू दिसू नये म्हणून त्याला सैल शर्ट घालण्यात आला आणि त्याला मास्क आणि कॅप देण्यात आली. यानंतर कॅमेरा त्यांच्या ताब्यात देण्यात आला. टीम हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी बीसीसीआयच्या टीमने रवींद्र जडेजाला सूर्याची ओळख विचारली तेव्हा जडेजा त्याला लगेच ओळखू शकला नाही, पण नंतर त्याला कळलं की तो सूर्यकुमार यादव आहे. यानंतर सूर्याने मुंबईच्या रस्त्यांबाबत अनेकांशी चर्चा केली.

हेही वाचा – दिवाळीपूर्वी जे व्हायचं ते झालंच! गॅस सिलिंडरचे दर ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

सूर्यकुमार यादव विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाचा एक भाग आहे. मात्र, तो आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळू शकला आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर तो एक विशेषज्ञ फलंदाज आणि फिनिशर म्हणून खेळला जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध तो स्वस्तात धावबाद झाला, पण इंग्लंडविरुद्ध त्याने लखनऊच्या मैदानावर 49 धावांची इनिंग खेळली. खराब खेळपट्टीवर आणि शेपटीच्या फलंदाजांसह त्याची खेळी प्रभावी ठरली. त्यामुळेच आता श्रेयस अय्यरवर धावा करण्याचे दडपण वाढले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment