टीम इंडियाचा ‘सुर्योदय’, गंभीरच्या डायरीत पहिली टिक, परागकडून लंकेची विकेट!

WhatsApp Group

IND vs SL 1st T20 : कोणत्याही कर्णधाराची दडपणाखाली कसोटी लागते आणि सूर्यकुमार यादव या कसोटीत उत्तीर्ण झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध अशा टप्प्यावर सूर्यकुमारने रियान परागकडे चेंडू सोपवला, जेव्हा विजयासाठी 4 षटकांत 56 धावांची गरज होती. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांची प्रत्येकी दोन षटके बाकी होती. अर्शदीप सिंग 17 वे षटक टाकेल, असे सर्वजण गृहीत धरत होते. पण सूर्या काही वेगळाच विचार करत होता. जेव्हा त्याने चेंडू रियान परागकडे सोपवला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. रियाननेही त्या क्षणी विकेट मिळवून दिली, ज्याची टीम इंडियाला नितांत गरज होती. भारताने हा सामना जिंकला आणि सूर्या संघाचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे सिद्ध झाले. प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचाही हा पहिलाच सामना होता.

यजमान श्रीलंकेने शनिवारी भारत विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 3 विकेट्सवर 213 धावा करून श्रीलंकेचे मनसुबे उध्वस्त केले. तसे, भारताप्रमाणेच श्रीलंकेनेही फलंदाजीत चांगली सुरुवात केली. एकवेळ त्यांनी 14 षटकांत एका विकेटवर 140 धावा केल्या होत्या. त्यावेळी श्रीलंका हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. भारताने शेवटच्या 6 षटकांत शानदार पुनरागमन करत श्रीलंकेला 19.2 षटकांत 170 धावांत गुंडाळले. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

निसांका-परेरानेचे चोख प्रत्युत्तर

214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेला आवश्यक ती सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 8.4 षटकांत 84 धावांची भागीदारी केली. अर्शदीप सिंगने ही धोकादायक जोडी फोडली. कुसल मेंडिसने बाद होण्यापूर्वी 27 चेंडूत 45 धावा केल्या.

हेही वाचा –भारत-श्रीलंका क्रिकेट मॅचपेक्षा भारी बातमी, ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या टीम इंडियाने न्यूझीलंडला रडवलं!

श्रीलंकेने शेवटच्या 30 धावांत गमावल्या 9 विकेट

कुसल मेंडिस बाद झाल्यानंतरही श्रीलंकेने चांगली फलंदाजी सुरू ठेवली. सलामीवीर पथुम निसांकाला दमदार खेळ करणाऱ्या कुसल परेराच्या रूपाने यावेळी चांगली जोडी मिळाली. या दोघांनी 14 षटकांत संघाला 140 धावांपर्यंत नेले. त्यावेळी भारतीय संघ दडपणाखाली होता. सूर्या ब्रिगेडला कोणत्याही किंमतीत विकेट हवी होती. अक्षर पटेलने ही गरज पूर्ण केली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या पाथुम निसांकाला (79) त्याने क्लीन बोल्ड केले. यानंतर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला. त्याचे बॅटर्स येत-जात राहिले. हे फलंदाज इतके घाईत होते की त्यांना पूर्ण षटकही खेळता आले नाही आणि श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत गडगडला. श्रीलंकेसाठी पथुम निसांकाने सर्वाधिक 79 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment