Video : तामिळनाडूच्या पोराचा वर्ल्ड रेकॉर्ड..! विराट, संगकारालाही सोडलं नाही; वाचा त्याचा भीमपराक्रम!

WhatsApp Group

Vijay Hazare Trophy 2022 N Jagadeesan World Record : विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनची बॅट जोरदार तळपत आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये एन जगदीशनने एक-दोन नव्हे तर सलग पाच शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाला एका मोसमात ४ पेक्षा जास्त शतके झळकावता आलेली नाहीत, मात्र या तामिळनाडूच्या फलंदाजाने विराट कोहलीसारख्या दिग्गजांचा विक्रम मोडला आहे.
२००८-०९ च्या मोसमात विराट कोहलीने प्रथम चार शतके ठोकली होती, तर एन जगदीशनने सलग पाच शतके ठोकून विराटचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. एवढेच नाही तर एका मोसमात सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहली, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांच्या नावावर नोंदवला गेला, जो एन जगदीशनने मोडला आहे.

नारायण जगदीशन सलग पाच लिस्ट ए सामन्यांमध्ये शतक झळकावणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुमार संगकारा, अल्विरो पीटरसन आणि देवदत्त पडिक्कल यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४-४ शतके झळकावली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा संगकारा हा एकमेव फलंदाज आहे.

हेही वाचा – आपल्या आवडत्या ‘पॉवर रेंजर’चं निधन..! मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

डबल हंड्रेड

यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमातील दुसऱ्या सामन्यात आंध्रविरुद्ध नाबाद ११४ धावा केल्या, त्यानंतर छत्तीसगडविरुद्ध १०७ धावांची खेळी केली. त्याचवेळी त्याने गोव्याविरुद्ध १६८ आणि हरियाणा संघाविरुद्ध १२८ धावा केल्या, तर अरुणाचल प्रदेशविरुद्ध २७७ धावा केल्या. या खेळीत त्याने २५ चौकार आणि १५ षटकार ठोकले. जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी २०२२ च्या सहा डावात ७९९ धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यादरम्यान त्याने सलग पाच डावात शतक ठोकून विश्वविक्रम केला आहे. या स्पर्धेत त्याची सरासरी १५९.८० आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १२५.८२ आहे.

संगकाराचा विक्रम मोडला!

विजय हजारे ट्रॉफीमधील पाचव्या शतकासह जगदीशन लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके करणारा खेळाडू बनला आहे. त्याने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे. संगकाराने २०१४-१५ वर्ल्डकपमध्ये सलग चार शतके झळकावली होती. त्याच्याशिवाय, भारताच्या देवदत्त पडिक्कलने २०२०-२१ विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग चार शतके झळकावली होती. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेच्या एल्विरो पीटरसनने २०१५-१६ मोमेंटम एकदिवसीय चषक स्पर्धेत सलग चार डावात शतके झळकावली. मात्र, सलग पाच डावांत शतक झळकावणारा जगदीशन हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

Leave a comment