Video : टीम इंडियानं बांगलादेशला हरवून जिंकला टी-२० वर्ल्डकप..! पाहा विनिंग मोमेंट

WhatsApp Group

T20 World Cup for the Blind : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची उपांत्य फेरीच्या पलीकडे प्रगती झालेली नाही. २०२१ मध्ये यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी टप्प्यातच बाहेर पडला. दुसरीकडे भारताचा आणखी एक क्रिकेट संघ आहे जो हार मानत नाही. विजयाची हॅट्ट्रिक नोंदवून हा संघ सलग तिसऱ्यांदा विश्वविजेता बनला आहे. या संघाने सलग तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. शनिवारी विजेतेपदाची लढाई जिंकून या भारतीय संघाने पुन्हा एकदा जागतिक ट्रॉफीवर देशाचे नाव कोरले.

भारताने सलग तिसऱ्यांदा दृष्टिहिनांचा टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. भारताने फायनलमध्ये बांगलादेशचा तब्बल १२० धावांनी पराभव केला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगला. कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि सुनील रमेश यांनी शतके ठोकली. संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही मॅच गमावली नाही. सुनीलला फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, तुमच्या शहरातील आजची किंमत जाणून घ्या

विशेष बाब म्हणजे दृष्टिहिनांचा टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाने जगातील इतर कोणत्याही संघाला ट्रॉफी उचलण्याची संधी दिलेली नाही. भारताने तिसऱ्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवले आणि सलग तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला.

असा रंगला सामना…

विजेतेपदाच्या लढतीत प्रथम खेळताना भारतीय संघाने २ बाद २७७ धावा केल्या. भारताकडून रमेशने सर्वाधिक नाबाद १६३ धावा केल्या तर अजयने १०० धावा जोडल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. एवढ्या मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशच्या संघाने आटोकाट प्रयत्न केले पण धावगती कायम राखता आली नाही. बांगलादेशच्या संघाने ३ बाद १५७ धावा केल्या. भारतीय संघाने विजेतेपदाचा सामना १२० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. व्हिसा समस्यांमुळे पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेतून मुकला, ज्यावरून सुरुवातीला वाद निर्माण झाला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment