T20 World Cup 2024 : आयपीएलदरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, तारीख आली समोर!

WhatsApp Group

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर टी-20 वर्ल्डकप सुरू होईल. आयपीएली फायनल रविवारी, 26 मे रोजी खेळवला जाईल आणि पाच दिवसांनी म्हणजे 1 जूनपासून टी-20 वर्ल्डकप सुरू होईल. अशा स्थितीत भारतीय खेळाडू अमेरिकेत गेल्यावर पाच दिवसांत संघ वर्ल्डकपसाठी कसा जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता आयपीएलच्या मध्यावर भारतीय खेळाडू वर्ल्डकपसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, भारतीय संघ 21 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. या पहिल्या तुकडीत त्या भारतीय खेळाडूंचा समावेश असेल जे आयपीएल प्लेऑफचा भाग नसतील. अशा स्थितीत आयपीएल 2024 दरम्यान कोणते भारतीय खेळाडू विश्वचषकासाठी रवाना होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आयसीसीने टी-20 वर्ल्डकप 2024 साठी संघांची घोषणा करण्यासाठी 1 मे ही अंतिम मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा कधी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय संघात कोणत्या यष्टीरक्षकांचा समावेश आहे, अशा अनेक बाबीही लक्षात ठेवल्या जातील. याशिवाय संघाच्या सलामीवीरांवरही प्रश्न कायम आहेत.

हेही वाचा – Solar AC : सोलर एसी बसवण्यासाठी किती खर्च येतो? किती बचत होते? जाणून घ्या!

रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल यांच्यापैकी सलामीची जबाबदारी कोण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांचा यष्टीरक्षकपदाच्या शर्यतीत समावेश आहे. अशा स्थितीत संपूर्ण टीम इंडिया पाहण्यासारखी असेल.

विराटचा समावेश नसल्याची चर्चा

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी विराट कोहलीला टीम इंडियामध्ये स्थान मिळणार नसल्याचीही जोरदार चर्चा आहे. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि तज्ञांनी विराट कोहलीला आपापल्या संघात स्थान दिले नाही. अशा स्थितीत कोहलीच्या निवडीकडेही लक्ष असेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment