टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, 9 जूनला भारत-पाक लढत!

WhatsApp Group

आयसीसीने या वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या पुरुषांच्या या वेळापत्रकात भारताला पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि कॅनडासह अ गटात ठेवण्यात आले आहे.

भारताचे सर्व गट सामने अमेरिकेत खेळवले जातील. टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024 Schedule In Marathi) मध्ये भारत आपल्या मोहिमेची सुरुवात न्यू यॉर्कमध्ये 5 जून रोजी आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने करेल, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाईल.

हेही वाचा – कृषी कर्ज घेताना CIBIL स्कोअर चेक केला जातो का? नियम काय सांगतो?

टी-20 वर्ल्डकप 2024 नवीन फॉरमॅटमध्ये आयोजित केला जाईल, ज्यामध्ये प्रथमच 20 संघ असतील. या संघांची प्रत्येकी पाचच्या चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर एटमध्ये प्रवेश करतील. या टप्प्यात उर्वरित संघ प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागले जातील. या गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि या स्पर्धेचा अंतिम सामना 30 जून रोजी होणार आहे.

भारताचे गट टप्प्यातील सामने

  • भारत विरुद्ध आयर्लंड – 5 जून, न्यूयॉर्क
  • भारत विरुद्ध पाकिस्तान – 9 जून, न्यूयॉर्क
  • भारत विरुद्ध अमेरिका – 12 जून, न्यूयॉर्क
  • भारत विरुद्ध कॅनडा – 15 जून, फ्लोरिडा

वेळापत्रक

  • गट टप्पा – 1 ते 18 जून.
  • सुपर 8 – 19 ते 24 जून.
  • उपांत्य फेरी – 26 आणि 27 जून.
  • अंतिम सामना – 29 जून

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment