T20 World Cup 2024 : बाबर आझमशी जुनी ठसन, आता 14 वर्षानंतर ‘हिसाब बराबर’!

WhatsApp Group

Saurabh Netravalkar Marathi Latest News : टी-20 वर्ल्डकप 2024 च्या दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करून इतिहास रचला. यूएसएने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आणि त्यांच्या विजयाचा नायक डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर ठरला. त्याने 4 षटकात केवळ 18 धावा देत 2 बळी घेतले. यानंतर सुपर ओव्हरमध्येही 19 धावांचे लक्ष्य राखले. आपल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे सौरभ नेत्रावलकरने 14 वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला.

सौरभ नेत्रावळकरबद्दल बोलायचे झाले तर तो मुळचा भारतीय आहे. त्याचा जन्म मुंबईत झाला आणि तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळला. त्याने अंडर-19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्वही केले आहे. 2010 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.

अंडर-19 वर्ल्डकप 2010 मध्ये पाकिस्तान संघाने भारताचा पराभव केला होता. त्या सामन्यात सौरभ नेत्रावलकर टीम इंडियाकडून खेळला होता. त्या सामन्यात त्याने 5 षटकांचा स्पेल टाकला, ज्यात त्याने फक्त 16 धावा देऊन 1 बळी घेतला. मात्र, त्या सामन्यात भारतीय संघाला 2 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे सध्याचा पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम देखील त्या सामन्याचा एक भाग होता. आता त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि सौरभ नेत्रावलकर हे त्याचे सर्वात मोठे कारण होते. अशाप्रकारे 14 वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला आता सौरभने घेतला आहे.

हेही वाचा – भारत विरुद्ध पाकिस्तान : पार्किंगसाठी 1 लाख रुपये, तिकीटाचे कमीत कमी 25 हजार, पैशापेक्षा मॅचचा रोमांच जास्त!

भारतात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर सौरभ अमेरिकेला गेला. दरम्यान, भारतात आयपीएल आणि इतर देशांमध्ये टी-20 स्पर्धाही सुरू झाल्या होत्या, मात्र सौरभने त्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. कॉर्नेल येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाही सौरभचे क्रिकेटबद्दलचे आकर्षण कमी झाले नाही. तो ओरॅकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करू लागला आणि तिथेही क्रिकेटचा एक भाग राहिला. यादरम्यान, तो लॉस एंजेलिस येथे 50 षटकांचा सामना खेळण्यासाठी गेला, ज्यामध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याची 2019 मध्ये यूएस राष्ट्रीय संघात निवड झाली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment