T20 World Cup 2022 : वसीम अक्रमची जीभ घसरली..! समोर बसलेल्या खेळाडूला म्हटलं गाढव? पाहा Video

WhatsApp Group

T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या सलग दोन पराभवानंतर एकच खळबळ उडाली आहे. भारतापाठोपाठ पाकिस्तानचाही झिम्बाब्वेकडून पराभव झाला होता, त्यानंतर माजी क्रिकेटपटू सध्याच्या संघावर नाराज आहेत. माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला फटकारले आहे, तसेच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेले एक विधान केले आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर चर्चा करत आहेत. यादरम्यान वसीम अक्रमने पाकिस्तानच्या मधल्या फळीवर प्रश्न उपस्थित केले आणि सांगितले की, शोएब मलिकसारख्या खेळाडूची गरज आहे, जो सतत स्वत:ला सिद्ध करतो.

काय म्हणाला वसीम अक्रम?

वसीम अक्रम पाकिस्तानच्या ए स्पोर्ट्स चॅनलवर म्हणाला, ‘जर मी कर्णधार असतो, तर माझे लक्ष्य फक्त विश्वचषक जिंकणे आहे, त्यावेळी मला गाढवालाही बाप बनवायचे असेल तर मी बनवेन. जर मला शोएब मलिक संघात हवा असेल तर मी निवडकर्त्यांना सांगू इच्छितो की मला त्याची गरज आहे.

हेही वाचा – सायबर, आर्थिक गुन्ह्यांपासून मुक्त होणार महाराष्ट्र? फडणवीसांचं ‘मोठं’ पाऊल!

वसीम अक्रमचे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले. सोशल मीडियावर लोकांनी सांगितले की वसीम अक्रमला कदाचित माहित नसेल पण तो शोएब मलिकला गाढव म्हणत आहे. ४० वर्षीय शोएब मलिक पाकिस्तानच्या संघाचा भाग नसला तरी फ्रेंचायझी लीगमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मध्यभागी डाव हाताळणे असो किंवा वेगाने धावा काढणे असो, शोएब मलिकने अनेक वेळा चमत्कार केले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानची मधल्या फळी पाहता त्याला टी-२० विश्वचषकाच्या संघात आणण्याची मागणी सर्वजण करत होते.

पाकिस्तानी संघाबद्दल बोलायचे झाले तर २०२२ च्या टी-२० विश्वचषकात भारताने पहिला पराभव केला होता, त्यानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा १ धावाने पराभव केला होता. अशा स्थितीत त्याला उपांत्य फेरी गाठणे फार कठीण झाले आहे, तो भारतासह गटातील इतर संघांवर अवलंबून आहे.

Leave a comment