T20 World Cup 2022 SA vs NED : नेदरलँड्सने रविवारी टी-२० विश्वचषकात मोठा कारनामा केला. स्पर्धेतील सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासह टीम इंडियाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धा होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरी गाठणारा गटातील दुसरा संघ बनेल. या सामन्यात प्रथम खेळताना नेदरलँड्सने ४ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. कॉलिन अकरमनने २६ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ८ बाद १४५ धावाच करू शकला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. ३९ धावांत संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. क्विंटन डी कॉक १३ आणि कर्णधार टेंबा बावुमा केवळ २० धावा करू शकले. सध्याच्या टी-२० विश्वचषकात पहिले शतक झळकावणाऱ्या रायली रुसोला काही अप्रतिम करता आले नाही. तोही २५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर हे दोघेही १७-१७ धावा करून बाद झाले. संघाने ११२ धावांत ५ विकेट गमावल्या.
हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंकेच्या ‘स्टार’ क्रिकेटरला अटक..! ‘हे’ आहे कारण
What an incredible game of cricket! 🔥
The Netherlands shock the world to register a brilliant win against South Africa.#T20WorldCup | #SAvNEDhttps://t.co/6vOK4N4Zs3
— T20 World Cup (@T20WorldCup) November 6, 2022
मिलर बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन संघाची धुरा सांभाळत होता. पण त्यालाही काही आश्चर्यकारक करता आले नाही. १८ चेंडूत 2२१1 धावा करून तो बाद झाला. यासह संघाच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. केशव महाराज १३ धावा करून बाद झाला. कागिसो रबाडा नाबाद ९ आणि एनरिक नॉर्कियाने ४ धावा केल्या. वेगवान गोलंदाज ब्रेंडन ग्लोव्हरने २ षटकात ९ धावा देत ३ बळी घेतले. फ्रेड क्लासेन आणि बास डी लीडने २-२ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर स्टीफन मायबर्गने ३७ आणि मॅक्स ओ’डॉडने २९ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या. तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या टॉम कूपरने १९ चेंडूत ३५ धावा केल्या. शेवटी अकरमनने सर्वोत्तम खेळी करत धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. केशव महाराजने ४ षटकात २७ धावा देत २ बळी घेतले. रबाडा चांगलाच महागात पडला आणि त्याने ४ षटकात ३७ धावा दिल्या. त्याचवेळी नॉर्कियाने ४ षटकात १० धावा देत एक विकेट घेतली.