PAK vs ZIM : कडक..! झिम्बाब्वेविरुद्ध बाबर आझमनं घेतला ‘कॅच ऑफ द टुर्नामेंट’; पाहा Video

WhatsApp Group

T20 World Cup 2022 PAK vs ZIM Babar Azam Catch : टी-२० विश्वचषक २०२२ चा २४ वा सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे (PAK vs ZIM) यांच्यात खेळला जात आहे. झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध पाकिस्तानचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झिम्बाब्वे पराभवाच्या मार्गावर असताना मात्र पावसाने त्यांना वाचवले. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जात आहे.

बाबरचा कडक झेल

पाकिस्तान संघाच्या क्षेत्ररक्षणावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक मोठ्या प्रसंगी त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी संघाला निराश केले आहे. पण झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने अप्रतिम झेल घेतला. डावाच्या १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक रेगिस चकाबवा क्रीझवर आला. शाबद खानचा चेंडू त्याच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाबर आझमपासून चेंडू दूर होता. पण बाबरने उडी मारून पराभवासह चेंडू पकडला.

हेही वाचा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणतात, “दुर्मिळ नाणी जपणं आवश्यक, कारण…”

पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी १३१ धावांचे लक्ष्य मिळाले. झिम्बाब्वेने ८ बाद १३० रन्स केले. सर्वाधिक ३१ धावा शॉन विल्यम्सने केल्या. सलामीवीर मधवेरे आणि इर्विनने पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने ४ तर शादाब खानने ३ बळी घेतले.

Leave a comment