Pak vs Nz Semifinal : अंपायरनं एकाच बॅट्समनला २ चेंडूत २ वेळा दिलं आऊट..! पाहा Video

WhatsApp Group

T20 World Cup 2022 Pak vs Nz semifinal : शाहीन आफ्रिदीने पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. न्यूझीलंडने २० षटकात २० षटकात ४ बाद १५२ धावा केल्या. त्यांच्याकडून डॅरिल मिशेलने ३ चौकार आणि एका षटकारासह ५३, केन विल्यमसनने एका चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले.

शाहीन आफ्रिदीने पहिले षटक टाकले. पहिल्या चेंडूवर फिन ऍलनने ऑफ साइडवर चौकार मारला. दुसरा चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि पंच मारायस इरामसने त्याला बाद केले. पण एलेनने लगेच रिव्ह्यू घेतला. पॅडला आदळण्यापूर्वी चेंडू बॅटला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले होते. अशा स्थितीत टीव्ही अंपायरने त्याला नॉट आऊट दिला.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर..! संजय राऊतांना मिळाला जामीन

शाहीन आफ्रिदीचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा एलनच्या पॅडला लागला. यावेळीही इरासम यांनी त्याला बाद केले. यानंतर एलेनने पुन्हा रिव्ह्यू घेतला. मात्र यावेळी चेंडू बॅटला लागला नाही आणि विकेटवर आदळला. अशा स्थितीत टीव्ही अंपायरने त्याला आऊट दिला. यानंतर डेव्हॉन कॉनवेने संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो २१ धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला धावबाद केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment