T20 World Cup 2022 Pak vs Nz Semifinal : बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिडनीत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला सहज आणि ७ विकेट्सनी मात दिली. दुसरी गूड न्यूज म्हणजे पाकिस्तानचे धोकादायक सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम फॉर्ममध्ये परतले. दोघांनी १२व्या षटकातच शतकी सलामी दिली. या सामन्याव्यतिरिक्त दोघांच्या फॉर्मवरून बरीच टीका होत होती. पण आता महत्त्वाच्या सामन्यासाठी त्यांचा फॉर्म परतला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र, त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. न्यूझीलंडने २० षटकात २० षटकात ४ बाद १५२ धावा केल्या. त्यांच्याकडून डॅरिल मिशेलने ३ चौकार आणि एका षटकारासह ५३, केन विल्यमसनने एका चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी कोणतेही दडपण न घेता मुक्त फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १०५ धावा केल्या. बाबरने ७ चौकारांसह ५३ धावा केल्या. १७व्या षटकात रिझवान बाद झाला. त्याने ५ चौकारांसह ५७ धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद हॅरिसने ३० धावा केल्या. १९.१ षटकात पाकिस्तानने विजयावर शिक्कामोर्तब केले.
WHAT A WIN, PAKISTAN! 🤯
Pakistan have reached their third Men's #T20WorldCup final 👏#NZvPAK pic.twitter.com/dumaIcWVeZ
— ICC (@ICC) November 9, 2022
हेही वाचा – करसंकलनात महाराष्ट्राचा पहिला नंबर..! मिळाला ‘मानाचा’ पुरस्कार
❌ Lost to 🇮🇳 by 4 wickets
❌ Lost to 🇿🇼 by 1 run
✅ Beat 🇳🇱 by 6 wickets
✅ Beat 🇿🇦 by 33 runs (DLS)
✅ Beat 🇧🇩 by 5 wickets
✅ Beat 🇳🇿 by 7 wicketsThey stuttered at the start, but Pakistan are now in the #T20WorldCup final! #NZvPAK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 9, 2022
दोन्ही संघांची Playing 11
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हारिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी.
न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.