T20 World Cup 2022 PAK vs ENG Final : मेलबर्नच्या मैदानावर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कप्तान जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या चांगल्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. २० षटकात पाकिस्तानने इंग्लंडला १३८ धावांचे आव्हान दिले.
पाकिस्तानचा डाव
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना चांगली सुरुवात करता आली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनने रिझवानला (१५) स्वस्तात बाद केले. त्यानंतर बाबर आझम (३२) आणि शान मसूद (३८) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोहम्मद हॅरिस (८), इफ्तिकार अहमद (०) यांची साथ लाभली नाही. इंग्लंडसाठी करनसोबत आदिल रशीदने सुंदर गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या. इंग्लंडकडून करनने ३ तर रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
हेही वाचा – Video : बाबर आझम होणार पाकिस्तानचा पंतप्रधान? वाचा सविस्तर!
Brilliant spells by Sam Curran and Adil Rashid help England restrict Pakistan to 137/8 in their 20 overs.
Can Babar Azam's team defend this modest total? 👀#T20WorldCupFinal | #PAKvENG | 📝 https://t.co/jOrORwQxFB pic.twitter.com/k9SXuMS5x4
— T20 World Cup (@T20WorldCup) November 13, 2022
दोन्ही संघांची Playing 11
इंग्लंड – जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन.
पाकिस्तान – मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हॅरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ.